Ticker

6/recent/ticker-posts

नवजीवन विद्यालयाचा निकाल १०० टक्के

रवी भोंगाने साकोली 
साकोली-नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत नवजीवन विद्यालय अँड ज्यु. सायन्स कॉलेज जमनापूरने यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. मेहविष पटेल ९५.५०  टक्के गुण मिळालेले असून त्याने शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कु. हितांशी गडेकर हिला ८५.८३  टक्के गुण मिळवून ती शाळेतून व्दितीय तर कु. खुशी सोडेजा ८३.३४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविलेले आहेत.
विज्ञान शाखेत परीक्षेला एकुण १०४ विद्यार्थी बसले होते त्यामध्ये ९  विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४०  विद्यार्थी व्दितीय श्रेणीत तर ४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे. नवजीवन विद्यालयाने परीसरात दर्जेदार व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळालेले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबददल संस्था  संस्थापक डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव डॉ. सौ. वृंदाताई करंजेकर, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे, व शाळेचे शिक्षक प्रकाश बडवाईक, दिलीप चौधरी, मुकेश येसनसुरे, अमोल वाकडे, दिलीप गहाणे, विष्णू गाढवे,चंद्रकला बिसने, अर्चना नवखरे, अल्का गोंधळे, प्रीती साखरे, संगीता खुणे तसेच शिक्षकत्तेर कर्मचारी मुनिश्वर करंजेकर,मुकेश साखरे, राकेश चकोले, सुरज नंदेश्वर, हेमराज सयाम, प्रमोद डोंगरवार व इतर कर्मचारी यांनी कर्मचारी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या