Ticker

6/recent/ticker-posts

गोविंदसिंघजी महाराज सत्यत् तपस्थान श्री हेमकुंड साहीब तिर्थ्यात्रेसाठी रवाना

हरदिपसिंग बावरी परभणी 
परभणी :- नांदेड येथील हुजुरी सिख तिर्थयात्रेकरूंचा जत्था आज मंगळवार दि. २१ मे २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता हुजुर साहीब नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसने सिख धर्माचे दहावे गुरु दसमपिता साहीब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांचे पवित्र तपस्थान श्री हेमकुंड साहीब तिर्थयात्रेसाठी रवाना झाला. हुजुर साहीब नांदेड येथून श्री हेमकुंड साहीब तिर्तयात्रेसाठी रवाना झालेल्या हुजुरी सिख समुदायाच्या जत्थ्यामध्ये पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब अबचल नगर गुरुद्वारा बोर्डाचे माजी सेक्रेटरी सरदार रविंद्रसिंघ बुंगई, सरदार जगदीपसिंघ नंबरदार, सरदार जगदीप सिंघ चौहान, सरदार जगजीतसिंघ खालसा, सरदार नरेंद्रसिंघ घाडीसाज, सरदार हरदीपसिंघ घाडीसाज, सरदार हरजीतसिंघ पेशकार, सरदार गुणवंतसिंघ घाडीसाज, सरदार हरदीपसिंघ घाडीसाज, सरदार सुमीतसिंघ घडीसाज, सरदार गुरुप्रकाशसिंघ घाडीसाज, सरदार सप्रीतसिंघ पेशकार, सतनामकौर घडीसाज, घडीसाज, हरप्रीतकौर पेशकर, गुरविंदरकौर पेशकर समावेश असून सदरील हुजूरी सिख तिर्थयात्रेकरू जत्था नांदेड तेंबा, दिल्ली अंबाडे, गोरेश ते अंबाडे श्री हेमकुंड साहेब , श्री हेमकुंड साहिब ते बद्रीनाथ , बद्रीनाथ ते पौंटा साहेब , पौंटा साहेब ते पवित्र तख्त आनंदपूर साहिब , आनंदपूर साहीब ते अमृतसर आदि पवित्र तिर्थक्षेत्र दर्शन देखे दि.०१ जून २०२४ रोजी हुजुरी साहिब नांदेड येथे येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या