Ticker

6/recent/ticker-posts

प्रेयसीच्या आत्महत्ये प्रकरणी प्रियकराची निर्दोष मुक्तता बार्शी सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल


हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज 
सोलापूर:- प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराची (शौकत इसाक मुलाणी) याची मुक्तता करण्याचे आदेश / निकाल बार्शीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश श्री. र.म. कुलकर्णी यांनी दिनांक २१/०५/२०२४ रोजी दिलेला आहे. आरोपीतर्फे अॅङ प्रशांत शेटे यांनी काम पाहिले.

याप्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, गोरीबाई गुलाब पठाण, रा. मुंबई हिने दि. १२/०४/२०१९ रोजी बार्शी पोलिस स्टेशन येथे अशी फिर्याद दिली होती की, तीच्या मुलीची मुलगी नसिम समीर शेख ही बार्शी येथील ४२२, गाडेगांव रोड, बार्शी येथे तिचे आई वडिलांसोबत राहत होती. तिचा निकाह समीर शेख याचे बरोबर झाला होता. नसीम ला दोन मुले होती. नसीमचे तीचे नवऱ्याबरोबर पटत नसल्याने ती अधुन मधुन गोरीबाईकडे मुंबई येथे राहत असे. दि. १०/०४/२०१९ रोजी तीला नसीमचा फोन आला की, तीला शौकत मुलाणी रा. ख्वाजा नगर, ४२२ बार्शी हा वारंवार त्रास देत असून तु जर त्याचेशी संबंध ठेवले नाही तर तुझे वडील गफार व दोन मुले रिहान व जियान यांना मारुन टाकतो. अशी धमकी देत आहे. आरोपी सोबत ती मुंबईला येत जात होती. त्यामुळे तीला तीचे जीवन नकोसे झाले आहे, त्याच टेन्शनमुळे तिची नात नसीम हिने दि. ११/०४/२०१९ रोजी दुपारी २.०० वाजणेचे सुमारास तिचे राहते घरी घरात ओढणीच्या सहाय्याने पत्र्याचे अँगलला गळफास घेऊन मयत झाली आहे. अशी तक्रार दिल्यानंतर बार्शी पोलिस स्टेशन येथे शौकत मुलाणी यांचेवर भारतीय दंड विधन कलम ३०६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक करण्यात आली होती.

सदर प्रकरणी अत्यंत नाट्यमय साक्षी झाल्या. सरकार पक्षातर्फे गोरीबाई पठाण, गफार शेख, तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रतिभा ठाकूर यांच्या साक्षी घेण्यात आल्या. या साक्षीदारांच्या उलट तपासातून जेम्स भाभी या महिलेशी सावकारी आर्थिक व्यवहारातून नसीमचे भांडण झाल्याचे समोर आले. एकंदरीतच सरकार पक्ष आत्महत्येस प्रवृत्त करुन नसीम हिच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याचा आरोप शाबीत करु शकत नसल्याने तसेच आरोपीचे वकील अॅड. प्रशांत शेटे यांचा युक्तीवाद ग्राह्य मानुन बार्शीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश श्री. र.म. कुलकर्णी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपीतर्फे अॅड. प्रशांत शेटे, अॅङ संकेत लकशेट्टी, अॅङ रोहन स्वामी यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या