Ticker

6/recent/ticker-posts

"त्या" निराधार गरजू महिलेस हॉटेल सुरु करून देण्यासाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मदत


दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, समाजहित अभियान प्रतिष्ठान, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, शहीद वीर भगतसिंग मित्र मंडळ, रुग्णहक्क संरक्षण समिती च्या वतीने मदत!


हरदीपसिंग बावरी  परभणी 
परभणी :-शहरातील एका गरजू  निराधार, विधवा महिला जयाताई निकाळजे यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी चहा नाष्ट्याच्या हॉटेल साठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान तथा  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे यांच्या कडे मदत मागितली होती. तेव्हा प्रमोद अंभोरे व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी सदरील महिलेच्या मदतीसाठी आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विविध सामाजिक संघटना पुढे येत दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, समाजहित अभियान प्रतिष्ठान, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, शहीद वीर भगतसिंग मित्र मंडळ, रुग्णहक्क संरक्षण समिती, श्रीराम प्रोविजन्स आदींच्या वतीने दिनांक 21 मे रोजी श्री राम प्रोव्हिजन्स गंगाखेड येथे सदरील महिलेला हॉटेल साठी लागणारे साहित्य रुपी किराणा व तरकारी सामान खरीदी करून श्रीमती जयाताई निकाळजे यांना स्वाधीन केले आहे. तसेच दिनांक 22 मे रोजी सायं. 4 वाजता या हॉटेलचे उद्घाटन तरोडा फाटा, गंगाखेड रोड येथे होणार आहे. यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदिपभाई निकुंभ, मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड, परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीरसिंग भाई टाक, महिला अध्यक्षा उषाताई पंचांगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे आदींचे आर्थिक योगदान व मोलाचे मार्गदर्शन लाभले, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथ बद्दर, परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, परभणी नांदेड संपर्क प्रमुख शिवशंकर सोनुने, सदस्य शेख इसाक यांचे तर समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, उपाध्यक्ष आकाश साखरे यांचे तर शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ च्या वतीने संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी तर रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, महिला अध्यक्षा सुरेखाताई खिल्लारे, सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सरोदे, जिल्हा परिषद समाजकल्याण निरीक्षक एच. ए. सय्यद साहेब, श्रीराम प्रोविजन्स च्या वतीने विशाल साखरे, आकाश साखरे, रुग्णसेवक रवि साबळे आदींच्या वतीने मदत करण्यात आली आहे. ही मदत केल्या बद्दल श्रीमती जयाताई निकाळजे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या