मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-मा. पोलीस अधीक्षक हिंगोली .जी. श्रीधर यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपुन छपुन चालणारे अवैध्द धंदे बाबत कडक भुमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्हयातील आणि चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्हयातील आरोपींना नियीमत तपासणे व त्यांचे विरूध्द फडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.
त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी, अवैध्द धंदे विरूध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा. पोलीस अधीक्षक .जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनात दि.०८/०६/२०२४ चे रात्री २३.०० पासुन दि.०९/०६/२०२४ चे सकाळी ०५.०० वा. पावेतो संपूर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहीमेत मा. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती चोरात, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशिकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा विकास पाटील, पो.नि.. नरेंद्र पाडळकर, पो.नि. पो.नि..गणेश यहारे, पो.नि. भोसले, पो.नि. तामे, पो.नि. विष्णुकांत गुट्टे, पो.नि. कुंदन कुमार वाघमारे, सपोनि अनिल काचमांडे, सपोनि, गजानन बोराटे, सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि विलास चवळी, सपोनि राम निरदोडे, सपोनि रामोड सपोनि रवि हुंडेकर, सपोनि अरूण नागरे, तसेच स्वागुशा चे सपोनि राजेश मलपिलु, सपोनि शिवसांव घेवारे, पोउपनि विकम विठुबोने व सर्वच पोलीस स्टेशन मधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.
सदर मोहीमेत जिल्हयातील एकूण ४५ ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हयातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपींचीही तपासणी करून, सदर मोहीमेमध्ये मा.न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निघुनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाचत मा. न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा इसमांविरूध्द एकुण (०८) अटक वॉरंट, (०१) समन्स बजावणी करण्यात आली. जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाचे ठिकांणी नाकाबंदी करण्यात येवुन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत तलवार/खंजर शस्त्र बाळगल्यामुळे एकूण (०३) भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तसेच अंधाराचा फायदा घेवुन चोरीचे करण्याचे उददेशाने संशयास्पदरित्या मिळुन आलेल्या इसमाविरूध्द पोलीस स्टेशन हिंगोली शहर, कळमनुरी, कुरूंदा, हिंगोली ग्रामीण एकुण (०३) इसमांविरूध्द कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला. तसेच हिंगोली जिल्हयातील बँक/ए.टि.एम. चेक करण्यात आले.


0 टिप्पण्या