Ticker

6/recent/ticker-posts

समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे यांनी केले ५० वेळा रक्तदान

सम्यक घुले यवतमाळ 

वर्धा: रक्तदान हेच जिवनदान या उदात्त भावनेतून समता सैनिक दल वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे यांनी रक्तदान करून रुग्णाला जीवनदान दिले.
    
           स्थानिक कस्तुरबा रुग्णालय  वर्धा येथील रुग्णाला A+ve रक्त गटाची आवश्यकता आहे असे कळताच समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे यांनी थेट रुग्णालयात जाऊन गरजवंत रुग्णाला ताबडतोब रक्तदान केले.
     
     प्रदीपजी कांबळे हे समता सैनिक दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ते आहेत.जिल्ह्यात समता सैनिक दल वाढविण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दर तीन महिन्याला  रुग्णालयात जाऊन ते गरजवंत रुग्णांना रक्तदान करतात. त्यांनी आतापर्यंत ५० वेळा रक्तदान केले आहे.अडचणीत सापडलेल्र्या रुगणांना   
ताबडतोब मदत पोहचविण्यास तत्पर असल्यामुळे ते संपूर्ण जिल्ह्यात रुग्णमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.
 
      रक्तदान केल्याबद्दल रुगणांच्या नातेवाईकांनी व डॉक्टारांनी त्यांचे आभार मानले.प्रत्येकांनी एकदा तरी रक्तदान करावे असे त्यांनी  यावेळी नागरिकांना आवाहन केले.
   
      यावेळी त्यांच्या सोबत ,समता  सैनिक दल वर्धा जिल्हा  संघटक अभय कुंभारे,अमरदीप कांबळे, प्रफुल कांबळे,चंदू भगत आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या