सुधा बैले मुंबई
कल्याण :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या शपथविधीच्या निमित्ताने भाजप आणि महायुतीकडून देशभरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जात आहे.
सामना कार्यालयाबाहेर भाजपच्या समर्थकांनी "मोदी ओरिजनल ब्रँड" असे आशयाचे बॅनर लावून महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोमणे मारले आहेत. या बॅनरबाजीमुळे परिसरात वातावरण तापले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या या बॅनरबाजीने महाविकास आघाडीचे नेते आणि समर्थक संतापले असून, त्यांनी या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान मोदींच्या शपथविधीच्या दिवशीच अशा प्रकारच्या बॅनरबाजीमुळे राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.


0 टिप्पण्या