जिल्हाप्रमुखासह निष्ठावंत शिवसैनिक मशालीचा भडका घेऊन निघाले मुंबईला
चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख पद बदलल्याने जिल्हाप्रमुखाची नाराजी.
राजेश येसेकर भद्रावती / वरोरा
भद्रावती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या वतीने वरोरा विधानसभा व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचा विरोध करत जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात न घेता पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाच्या नाराजीमुळे सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये शिवसेनेच्या मशालीचा झाला भडका यामुळे जिल्हा कार्यालय समोर निषेध व्यक्त केला.
जिल्हाप्रमुखासह निष्ठावंत शिवसैनिक निघाले तिहेरी मशालीचा भडका घेऊन मातोश्रीवर आता हा भडका मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे काय योग्य निर्णय घेऊन तिसरी मशाल हटवणार की कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
जर तसे नाही झाले तर शिवसैनिकांत मतभेद होऊन शिवसेनेला खिंडार पडल्याशिवाय राहणार असे काही राजकारणी जाणकारांचे मत आहे.
वरोरा - भद्रावती विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो. या क्षेत्रातील खासदार आमदार शिवसेनेतूनच गेलेले आहेत. पडझड झालेल्या शिवसेनेची जिल्ह्यामध्ये बांधणी करून विधानसभेमध्ये कणखर नेतृत्व उभे करण्यात आले होते. शिवसेनेचाच आमदार या ठिकाणी बनणार अशी आशा येणाऱ्या विधानसभेमध्ये जनतेला लागली होती. राजकारणाचे सर्व समीकरणे जीवतोडे यांच्या बाजूने उभे असताना सुद्धा कुरघोडीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हाप्रमुख जिवतोडे हे विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. मात्र अचानक विधानसभेच्या निवडणुका आधी करण्यात आलेल्या फेर बदलामुळे शिवसेनेना संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
आता विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईसाठी रवाने झाले असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली आपबिती सांगणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना उबाठा गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
*एका निष्ठावंत शिवसैनिकांने नारजीचा सुर काढत आपले मत व्यक्त करून जाहीर निषेध केला.*
*ज्याने केला शिवसेनेशी घात त्याच्याच खांद्यावर शाबासकीची थाप...!*
*लोकसभेत ज्याने दिली भाजपला साथ त्याचीच नियुक्ती करण्याचा पक्षाने घातला घाट*
साहेब....जय महाराष्ट्र
साहेब मी आपला निष्ठावंत शिवसैनिक बोलतोय...साहेब आम्हा निष्ठवंतांचा घात झालो हो,पक्ष संघटनेसाठी आम्ही जीवच रान केलं, पक्षावर झालेल्या आघातानंतर सुद्धा आम्ही न डगमगता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. वेळोवेळी पक्षाचा आदेश सर आखो मे म्हणत जय भवानी,जय शिवाजी हा नारा लावत रस्त्यावर उतरलो..पण आमच्या निष्ठवंताना आमच्या निष्ठवंतेच चांगल फळ मिळालं हो....साहेब घात झाला हो...ज्या मिंदेने लोकसभेत कमळा बाईला साथ दिली...ज्या मिंदेने पक्ष आदेश मोडला...ज्या मिंदेने मी पक्षापेक्षा मोठा म्हणत निष्ठावंत सैनिकांचे खच्चीकरन केले...अश्या ४२० मिंदेला शब्बास्कीची थाप देत...नियुक्ती दिली...साहेब घात झाला हो...!
पक्षाच्या अडीअडचणीत प्रामाणिक सोबत राहणारे निष्ठावंतांना विश्वासात न घेता केलेल्या नियुक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. साहेब ४२० मिंदेच्या सोबत हा प्रामाणिक शिवसैनिक कधीच उभा राहणार नाही.आमचे नेतृत्व फक्त आमचा निष्ठावंत जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहो आणि राहणार...असे आत्मविश्वासाने बोलुन दाखविले.


0 टिप्पण्या