( *पो.स्टे. बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कार्यवाही ) 459 ग्रॅम वजनाचे 40,621 रू. चे चांदीचे दागीने जप्त*
मोईन कादरी हिंगोली
हिंगोली:- जिल्हयातील कळमनुरी तालुका अंतर्गत मौ. डोंगरकडा यागावी दिनांक २३/०६/२०२४ रोजी रात्री
दरम्याण फिर्यादी सोमेश रोडे यांचे ज्वेलरी दुकानाचे शटर वाकवुन दुकाणात प्रवेश करून ४५९ ग्रॅम चांदीचे दागीने किं ४०,६२१ रूपयाचा मुददेमाल चोरून नेला होता. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तकारी वरून पो.स्टे. बाळापुर येथे गुरनं. ३६४/२०२४ कलम ४६,३८० भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हा तात्काळ उघड करून त्यातील आरोपी अटक करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक .जी. श्रीधर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा. विकास पाटील यांचे मार्गदर्शनात पोस्टे. बाळापुर ये प्रभारी अधिकारी सपोनि सुनिल गोपीनवार आणि त्यांचे पथक तसेच स्वागुशा चे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट देवुन तपासाची चके गतीमान करून व गोपनीय बातमीदार मदतीने तपास करत असतांनाच दिनांक- २५/०६/२०२४ रोजी रात्रौ दरम्याण नमुद परीसरात दरोडयाच्या तयारीत असणा-या ०६ इसमांच्या टोळीचा पाठलाग करून त्यातील तिन इसमांना ताब्यात घेतले होते. नामे राजु गणेश पवार रा. इंदीरा नगर कळमनुरी व इतर ०२ इसम हे अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक होते. पो.स्टे. बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपींकडे कौशल्यपुर्ण व कसुन चौकशी व तपास करता नमुद आरोपींनी दिनांक २३/०६/२०२४ रोजी डोंगरकडा येथील ज्वेलरीचे शटर फोडुन चांदीचे दागीन चोरून नेले बाबत कबुली दिली. आज रोजी आरोपी नामे राजु गणेश पवार रा. इंदीरा नगर कळमनुरी यांचे ताब्यातुन तपास पथकाने गुन्हयातील चोरीला गेलेले खालील वर्णनाचे
चांदीचे ब्रासलेट, चांदीचे चैन, चांदीचे मुकुट असे ४५९ ग्रॅम वजनी चांदीचे संपुर्ण मुददेमाल किंमत अं. ४०,६२१ रू. चा मुददेमाल जप्त केले आहे.
नमुद आरोपींनी विचारपुस दरम्याण पो.स्टे. पुर्णा जिल्हा परभणी हददतही घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा
उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात पोलीस निरीक्षक . विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि राजेश मलपिलु, पोउपनि बालाजी गोणारकर, पोउपनि शिवाजी बोंडले, सफौ नागरे, पोलीस अंमलदार नागोराव बाभळे, रामदास ग्यादलवाड, शेख बाबर, गजानन पोकळे, प्रभाकर भोम, विजय जाधव, शेख अन्सार, बेले, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, शिवाजी पवार, हरी चव्हाण, सर्व पोस्टे बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.


0 टिप्पण्या