रुपाली डोंगरे चित्रा न्युज
जालना :-मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. 8 जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कठोर उपोषण सुरू आहे. उगाचच मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील गोड बोलून काटा काढायचं काम सुरू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. एकीकडे तातडीने मार्ग काढू म्हणायचं इकडं कठोर उपोषण सुरू आहे.
इकडे आमरण उपोषण सुरू आहे. सरकार मुद्दाम बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकार मुद्दामहून डाव खेळत आहे त्यांना माया असते तर दखल घेतली असती. सरकारकडून खेळवणे सुरू आहे, असे दिसते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर मराठे चांगला हिसका दाखवतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितले आहे. परंतु मी उपचार घेणार नाही. माझी भूमिका कायम आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपचारास नकार दिला. यावेळी बोलताना त्यांनी तू थोडे थांब तुला कळेल, असे म्हणत छगन भुजबळ यांनाही थेट इशारा दिला.


0 टिप्पण्या