Ticker

6/recent/ticker-posts

बारव्हा येथे बसपा साकोली विधानसभा क्षेत्राची बैठक

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभा क्षेत्राची बैठक रविवार(ता.२३जून) रोजी महात्मा गांधी विद्यालय बारव्हा येथे घेण्यात आली. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा सचिव सोपान दिवठे, धीरज गोस्वामी, साकोली विधानसभा अध्यक्ष स्वप्नील(बिट्टू) गजभिये, विधानसभा प्रभारी मनोज कोटांगले, विधानसभा कोषाध्यक्ष कार्तिक मेश्राम, विधानसभा महासचिव छोटेलाल गेडाम, अमित रामटेके, नितीन मेश्राम, रोशन फुले, चक्रधर सोनटक्के, चंद्रकांत चव्हाण, प्रमोद बारसागडे, बंडू फुलझेले, भीमपाल राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यात ३० जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीचा कार्यक्रम साकोली येथे साजरा करण्याचे ठरविण्यात आले व आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याकरिता सेक्टर, बूथ वर पोहचण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. यावेळी साकोली विधानसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा पदाधिकारी सेक्टर व बूथ पदाधिकारी, कार्यकर्ता आणि हितचिंतक बैठकीला बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या