रुपाली मेश्राम चित्रा न्युज
औरंगाबाद :-सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने 8 जुलैला पेट परीक्षा आणि अन्य मागण्यांसाठी भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. औरंगाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर दुपारी 12 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत.
या मागण्यांमध्ये पीएचडी आणि एमफील संबंधित काही मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, सध्याच्या पेटच्या जाहिरातीमध्ये बुद्धीझम, पत्रकारिता, संगीत, राज्यशास्त्र आणि इतिहासाच्या विषयाची एकही जागा दिली नाही.
त्यामुळे पेट परीक्षेत या विषयांना सामावून घेण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या