🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - ४ जुलै
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत
२०८०
भा. रा. १३ आषाढ १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : ग्रीष्म
मास: ज्येष्ठ
पक्ष: कृष्ण
तिथी: चतुर्दशी (२९.००) ~ अमावास्या
वार : गुरूवार
नक्षत्र : मृग (२८.००) ~ आर्द्रा
राशी : वृषभ (१६.००) ~ मिथुन
*शिवरात्र*
अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री (पहाटे) ५ वाजता
*स्वामी विवेकानंंद पुण्यस्मरण* (दिनांकानुसार)
*अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन*
१९९९: लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील *’टायगर हिल्स’* हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.
१९९७:’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.
१९४७:ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
१९४६:सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९३६: ’अमरज्योती’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ
१९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
१८८६: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.
१७७६:अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.
१७१९: तब्बल २९ वर्षांच्या कैदेतून बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी महाराणी येसूबाई यांची दिल्लीला जाऊन, मोठ्या अक्कलहुशारीने राजकारण लढवून सुटका केली. *(सविस्तर माहिती सोबत दिली आहे.)*
जन्मदिवस :
१९२६:विनायक आदिनाथ तथा ’वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक
१९१४:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ भावगीत लेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९१२ : पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
१८९८ : गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक.
१८०७ : जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता
१७९० : भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट
मृत्यूदिन:
१९९९:वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
१९८२:भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार
१९८० : रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ’पाणकळा’, ’सराई’, ’पड रे पाण्या’, ’आई आहे शेतात’, ’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्या अतिशय गाजल्या.
१९६३ : पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार
१९३४:मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
१९०२:स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी" त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.
१८२६ : थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात.
१७२९:कान्होजी आंग्रे – सेना सरखेल
*।। दास-वाणी ।।*
आकाशापासून वायो जाला ।
तो दों प्रकारें विभागला ।
सावधपणें विचार केला ।
पाहिजे श्रोतीं ।।
येक वारा सकळ जाणती ।
येक वायोमधील जगज्योती ।
जगज्योतीच्या अनंतमूर्ती ।
देवदेवतांच्या ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १०/०३/१२-१३
आकाशामधे वायू निर्माण होतो.
तो वायू दोन प्रकारामधे विभागला जातो. याचा श्रोत्यांनी सावधपणे सूक्ष्म विचार करावा.
एक म्हणजे सर्वांना माहीत असलेला आणि चलनवलनातून सतत जाणवणारा वारा.
दुसरा म्हणजे वायूमधील जगज्योती म्हणजे जाणीव कळा.
या जाणीव कळेच्या देवदेवतांची असंख्य रूपे मूर्तीरूपात पहायला मिळतात.
लाकडी प्रतिमा, माती, पाषाण, धातूच्या मूर्ती आपण पुजतो.त्या देवतांचे सामर्थ्यही कित्येकजण अनुभवतात. या देवतांची शक्ती मूर्तींमधे आहे असे लोक मानतात.
परंतु ते देवत्व वायुरूप शक्तीमधे असते जी जगज्योती किंवा जाणती कळा म्हणून ओळखली जाते.
*देहआशंकाशोधन समास.*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या