Ticker

6/recent/ticker-posts

नगरपरिषद प्रशासनाने घेतली शाळेची दखल

रवी भोंगाने साकोली 
 साकोली:- स्थानिक गणेश वॉर्ड  येथील सर्वाधिक पुरातन शाळा. ही शाळा रस्त्यावर असल्याने विद्यार्थ्यांचे अवागमन सुरू असते. त्यामुळे येथील शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसमोर गतिरोधकाची मागणी केली होती. अखेर नगरपरिषद प्रशासनाने शाळेची दखल घेऊन शाळेसमोर गतिरोधक बसवून दिले. सविस्तर वृत्त असे की, गणेश वॉर्ड येथील माझी जनपद शाळा. विद्यमान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १. अवघ्या ४ ते ५ वर्षात शाळेतील शिक्षक वृंदाच्या वतीने  शाळेने फिनिक्स भरारी घेतली. त्यामुळे कधीकाळी ८० च्या वर असणारी विद्यार्थ्यांची संख्या आगामी काळात ३०० कडे वाटचाल करू लागली आहे. ही शाळा रस्त्यावर आहे. सदर शाळे समोरील रस्ता हा सरळ राष्ट्रीय महामार्गाकडे जातो. दुसरीकडे शाळा परिसरात व्यापारी दुकाने असल्याने वाहनाची वर्दळ असते. अशातच काही रोड रोमियो आणि सडकछाप मजनू स्वतःला शाहरुख खान समजून वेगाने दुचाकी चालवित होते. रस्त्यावर विद्यार्थ्यांचे अवागमन सतत सुरू असल्याने वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने गतिरोधक लावण्याचा निर्णय घेऊन नगरपरिषद प्रशासनाकडे गतिरोधकाची मागणी केली. सोमवार पर्यंत गतिरोधक लावून देण्याची आगामी विनंती सूचनासुद्धा नगरपरिषदकडे  करण्यात आली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला. अखेर शाळा व्यवस्थापन समिती आणि प्रसिद्धी माध्यमाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारला हे गतिरोधक नगरपरिषद प्रशासनाकडून बसविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या