Ticker

6/recent/ticker-posts

हाळी गावच्या पाईप लाईनसाठी खोदलेल्या राज्यमार्गावर बनलाय"मौत का खड्डा"


गुत्तेदार "स्वामी" हा खड्डा बुजवण्यास
ठरला "असमर्थ"

राज्यमार्ग खोदायचे "परमीट" स्वामी नामक गुत्तेदारास दिले कुणी ?

विठ्ठल पाटील लातूर 
लातूर  :-तिरु नदी प्रकल्पातुन ग्राम पंचायत हाळी तर्फे नविन पाईपलाईन केली.माञ.ही पाईप लाईन करताना संबधित गुत्तेदाराने वडगाव जाणा-या काॅर्नर जवळील नविन "टकाटक" बनवलेला रोड (राज्यमार्ग) खोदला आहे. आणी हा खोदलेला राज्यरस्ता जसा होता तसाच दुरुस्त करणे गरजेचे असतानाही याकडे स्वामीने जाणुनबुजून दुर्लक्ष केले.म्हणुन या रोडवर भला मोठा व लांबचलांब "मौत का खड्डा" तयार झाला असुन, परवा बाईक चालकाला खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने एक महिला बाईकवरुन पडली आणी बेहोश झाली होती. तसेच रोज शेकडो वाहने "धडाधड" आदळतात.अशी माहिती रज्जाक मनियार यांनी दिली. तसेच राज्यमार्ग खोदा व जिवघेणे खड्डे तेथे करा.अशी परवानगी सा. बांधकाम खात्याच्या अधिका-यानी काय व किती खाऊन दिली आहे ?
तसेच या खड्ड्याची दुरुस्ती संबंधित गुत्तेदार करणार का सा.बां.खाते ? असे प्रश्न जनतेसह वाहनधारकांतुन चर्चीत आहे.हाळीतील नवीन वाॅटर फिल्टर नळ योजनेच्या पाईप लाईन साठी हा "जीवघेणा खड्डा" केला आहे.तेंव्हा त्यांनीच याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.आणी याबद्दल फोन करुनही स्वामी नामक गुत्तेदार  फोन उचलत नाही.अशी माहिती शेख फारुख यांनी दिली.तसेच हे काम MGP  कडे आहे व ग्रा.पं.ने अद्याप ही योजना हस्तांतरीत करुन घेतलेली नाही.म्हणुन हा खड्डा दुरुस्त करायची जबाबदारी स्वामी नामक गुत्तेदाराची आहे.अशी माहिती ग्राविअ.मनोहर जानतीने यांनी फोनवरुन दिली आहे.
या राज्यमार्गावर "मौत का खड्डा" करणारा "स्वामी" नामक गुत्तेदार हा खड्डा बुजविण्यास "असमर्थ" दिसत आहे.तेंव्हा त्याच्यावर सा. बां.खाते, उदगीरचे J.E.कारवाहीसाठी "समर्थ" आहेत का.याकडे जनतेचे लक्ष आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या