हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
भंडारा :-अत्यंत मनमिळावू, हसमुख स्वभावाचे व्यक्तिमत्त्व डॉ .यशवंत गायधनी यांचे रात्री १.०० वा नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.ते ७४ वर्षाचे होते.काही दिवसा पासून त्यांचे शारीरिक स्वास्थ्य बरोबर नव्हते .आज सकाळी त्यांना नागपूर येथून छोटा बाजार,गांधी चौक येथील निवास स्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात आले.दुपारी ३.०० वा त्यांचा निवास येथून अंत्ययात्रा काढण्यात येईल.त्यांचे मागे त्यांची पत्नी,दोन मुले व आप्त परिवार आहे.ते आयुर्वेदाचार्य डॉक्टर होते.
ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहर नगर येथे सेंट्रल शाळेत प्रिन्सिपॉल पदावरून ते अनेक वर्षापूर्वी सेवानिवृत्त होवून योग,ध्यान धारणा ई ना आपल्या जीवनात अंगिकार केला होता.ते एक चांगले लीडर सुध्धा होते,समाजकार्यात ही त्यांची मोलाची भूमिका होती,आणि ते एक उत्कृष्ट वक्ते पण होते. भंडारा जिल्हा पतंजली योग समिती शी ते अनेक वर्षा पासून जुळलेले होते.ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन चे ते कार्यकारिणी सदस्य ही होते.त्यांचा मोठा मुलगा इंग्लंड तर लहान मुलगा सिंगापूर येथे मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत.त्यांचा एक मोठा मित्र परिवार होता.त्यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधी ही भरू शकणार नाही.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.


0 टिप्पण्या