विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-जिल्हा व राज्य नव्हे तर सबंध भारतात हंडरगुळी ता.उदगीर येथील आठवडी बाजार सुप्रसिध्द आहे.तसेच येथील बाजारात ताजा —टवटवीत भाजीपाला मिळतो,म्हणुन चाकुर,अहमदपुर, रेणापुर,देवणी, जळकोट,तालुका व परिसरातील 100 एक गावातील जनता संपुर्ण 8 दिवसाचा भाजीपाला घेतात.माञ दि. 7 जुलै रोजी बाजारात फेरफटका मारलो असता सगळ्या भाज्यांचे दर वाढल्याने गरीब,मजुर "होममिनिस्टर" चे बजेट कोलमडल्याचे व वाढलेल्या दरांमुळे महिला बेजार झाल्याचे बोल ऐकू येतात.
भेंडी ८० चवळी ८० सिमला ८० मिरची १०० कांदे ३० बटाटे ३० टमाटे ८० वांगे ४० गवार ८०
पातीचे कांदे ६० दोडके ६० रुपये किलो आहेत.
—————————————————
मापात पाप तरीही अधिकारी चुपचाप"
————————————————
हंडरगुळीच्या अठवडी बाजारात कांही विक्रेते माप म्हणुन दगडाचा वापर करतात.व यात ५० ग्रेॅम पासुन १ किलो पर्यंत दगडी माप वापरतात.यात पाप होत असुनही संबंधित अधिकारी चुपचाप का?
—————————————————
पावसाची तडन व अवकाळीचा तडाखा तसेच खते,बि-बियाणे यांचा वाढलेला दर यामुळे सध्या सगळा भाजीपाला वाढला आहे..
अशी माहिती विक्रेता माजीद एच. चौधरी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.


0 टिप्पण्या