Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करा


खा. प्रशांत पडोळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अवैध धंद्याचे साम्राज्य निर्माण असल्याची माहिती जनतेद्वारा जन्विर्वाचीत खासदार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांचे पर्यंत आली असल्याने जिल्ह्यात कसलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यात यावी. यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन दिले आहे. महसूल प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते. याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 
                          भंडारा जिल्ह्यातील रेतीचे अवैध उत्खनन, मॅगनीज चोरी, जुगार, ड्रग्स, बनावटी दारू व विविध अवैध कामाचे बाबतीत जनतेत रोष आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदी, सूर नदी, बावनथडी नदी, चुलबंद नदी, वाघ नदी यातील घाटावरून नदीपात्रातून सर्रास अवैध रेतीचे उत्खनन केले जाते. मोठ्या प्रमाणावर मॅगनीज चोरी होत असल्याचे दिसून येत आहे.जुगार, ड्रग्स, बनावटी दारू मुळे जिल्ह्यातील युवकांवर त्याचे वाईट परिणाम होत असून जनतेत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. करोडोचा महसूल डुबविल्या जातो. याकडे सर्व अधिकारी नेहमीच कानाडोळा करीत असतात. ट्रक व ट्रक्टर, जेसीबी च्या साहाय्याने रेती उपसा करून वाहतूक केली जाते. रस्त्याने ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. शासनाने अजूनही काही रेती घाटाचे लिलाव केले नाही, त्यामुळे अनेक रेती माफीया या व्यवसायात सक्रिय झाले आहेत. रोज रात्री व दिवसा अवैधरित्या रेतीचे उत्खनन केले जात आहे. असे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे म्हणणे आहे.
                           विना नंबर प्लेटच्या बर्‍याच रेती माफियांच्या गाड्या आहेत. तरीपण वाहतूक विभागाचे त्याकडे लक्ष नसल्याचे दिसते. आर्थिक देवाण घेवाणीमुळे संबधीत अधिकारी कारवाई करत नसल्याची चर्चा दोन्ही जिल्ह्यात आहे. संबधीत अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने रेती माफिया सक्रिय झाले असून त्यांची दहक्षत निर्माण झाली आहे. गुन्हेगारी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरी व ग्रामीण भागात रस्त्याला ओव्हर लोड वाहतुकीमुळे खड्डे पडले असल्याने लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. घरकुल लाभार्थ्यांना आजही पुरेशी रेती मिळत नाही. असे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे म्हणणे आहे. 
                        अनेकदा लेखी अर्ज करून सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात रेती दिली जात नाही. आता पावसाळा सुरू होत असल्याने अवैध रेतीचे उत्खनन थांबविले गेले पाहिजे. महसूल विभाग, पोलिस विभाग, खनिज विभाग, वाहतूक विभाग यांनी तात्काळ अवैध रेतीचे उत्खनन थांबवून रेती माफियांवर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी खासदार प्रशांत पडोळे यांनी केली आहे. न केल्यास जनतेच्या  पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन. असे निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या