" ११ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनी शहरासाठी अभिमानास्पद
रवी भोंगाने साकोली
साकोली : महान वैज्ञानिक व दिवंगत पूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वृत्तपत्र वाटप प्रेरणेने रत्नेश कुमार प्रजापती हे एक महान व्यक्ती भारत देशातील आदर्श व्यक्तीमत्व आहेत. आज ते प्रत्येक युवा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत बनलेले आहेत. याचीच प्रचिती साकोली शहरात ११ वीत शिकणाऱ्या मुलीने सकाळी फावल्या वेळात वृत्तपत्रे वितरण करून आजच्या आळशी व "दे गा हरी पलंगावरी" म्हणणाऱ्या स्वयंघोषित बेरोजगार युवकांना जबरदस्त चपराक लावली आहे. आपल्या बालपणीच्या कठीण परिस्थितीत महान वैज्ञानिक व दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी वृत्तपत्रे वितरण केले होते. त्यांचा आदर्श साकोली येथील चिन्मयी मनोहर गणविर या ११ वीत शिकणाऱ्या मुलीने घेतला. ती आज साकोली शहराच्या इतिहासात पेपर वितरण करणारी प्रथम विद्यार्थीनी ठरली आहे. चिन्मयी मनोहर गणविर ही ॲड. मनोहर गणविर यांची मुलगी आहे. "चिन्मयी" म्हणजे शुद्ध ज्ञानात आनंद अशी तीच्या शब्दांची परीभाषा असून वृत्तपत्रे वाटप करतांना तिला अत्यंत आनंद होतो. सदर प्रतिनिधीने या संदर्भात चिन्मयीला बोलते केले असता ती म्हणाली की, सकाळी सायकलने पेपर वाटून मला शारीरिक व्यायाम मिळतो. वृत्तसेवा करतांना वृत्तपत्रातून जगतातील विविध ज्ञानही मला प्राप्त होते. स्वबळावर उभे राहून मी वृत्तपत्रे वितरण करतांना जी मिळकत येते त्यातून माझे शिक्षण साहित्यही मी स्वतःच्या कमविलेल्या पैशातून घेऊ शकते. घरून तर मला सर्व मिळतेच. पण स्वपैशानी कार्य करून मला जो आनंद, व्यायाम आणि बुद्धी प्राप्त होते त्याचे मला समाधान आहे. चिन्मयी ही दररोज सकाळी ०५:३० ला नित्यक्रमाने साकोली बसस्थानक येथे येत असते. त्यानंतर आपल्या प्रभागातील जनतेच्या घरोघरी वृत्तपत्रे वितरण करीत असते. या नवलाईचे साकोली शहरातील जनतेने स्वागत केले असून " चिन्मयी " चा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे बोलले जाते. या वेळी चिन्मयीच्या या कर्तबगार कामगिरीला साकोली वृत्तपत्र समूहातर्फे वृत्तपत्र विक्रेता संघ साकोली, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, साकोली मिडीया नेटवर्कने कूनिर्सात केला आहे.
-----------------------------------------------------------------
मला खरोखरच वृत्तपत्र वाटप करतांना आनंद होतो. याचबरोबर शारीरिक व्यायामही होतो. कोणकोणत्या वृत्तपत्रांतून कोणकोणती मुख्य बातम्या आहेत आणि ते कोणत्या विभागाशी संबंधित आहेत याची मला पूर्णपणे माहीती होते व हे कार्य करतांना मला कोणताही कमीपणा वाटत नसून उलट अति आनंद होतो"
-- चिन्मयी मनोहर गणविर
"विद्यार्थीनी"
नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय साकोली


0 टिप्पण्या