मो सईद शेख,भंडारा
भंडारा जिल्ह्यातील ग्राम गोपीवाडा निवासी श्री, श्रीरामजी डोळस यांचे तिन्ही पुत्र भारतीय सेनेत सेवा देत आहेत,
चंद्रशेखर डोळस, मराठा रेजिमेंट,तर लीलाधर डोळस हे आर्मीत मेडिकल अधिकारी, आणि किशोर डोळस हे जम्मू काश्मीर ला हवालदार या पदावर तैनात आहेत,, वडिलांकडून प्रेरित होऊन देश सेवेकरिता तिन्ही भावांनी इंडियन आर्मी निवडली,,
श्री, चंद्रशेखर डोळस हे आता सेवा निवृत्त झाले आहेत, आणि भंडारा पोलिस दलात कार्येरत आहेत. भारतीय सेनेत असतांनी त्यांनी घातक कमांडो , NSG ब्लाककॅट कमांडो, वेपण इंस्पेक्टर, असे बरेच महत्व पूर्ण कोर्सेस आवडीने केले, आणि त्यात उत्कृष्ट प्रावीण्य प्राप्त केले, त्यांनी घातक प्लाटून टीम लीडर म्हणून लिड केले व 19 वेळा आतंकवादी टीम चे एन्काऊंटर केले, व एका एन्काउंटर मध्ये त्यांना गोळी सुध्दा लागली,, एवढेच नव्हे तर त्यांची आर्मी मधून विशेष निवड NSG कमांडो मध्ये झाली त्यात सुद्धा प्रशिक्षण कालावधीत त्यांनी AI (इंस्टेक्टर) "बेस्ट इन फिजिकल",म्हणून प्रावीण्य प्राप्त केले, 2016 मध्ये पठाणकोट एअर बेस (पंजाब)येथे आतंकी हमला झाला तेव्हा NSG कमांडो ला विशेष मागणीकेली गेली त्या टीम चे नेतृत्व श्री डोळस सर यांनी केले,, आपली पोस्टिंग कठीण ठिकाणी करणे आतंकवाद्यासी एन्काऊंटर करणे, ही त्यांची हॉबीच होती, सोबतच ते उत्कृष्ट धावक आणि बॉक्सर सुध्धा राहिले आहेत, सन 2018 वर्षी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली, व कमांडो ग्रुप या NGO ची स्थापना केली . स्वतः व आपल्या पूर्ण टीम सहित सशक्त आणि समृध्द राष्ट्र निर्माण कामी सवतःला झोकून दिले,,
आपल्या अंगी असलेल्या कला कौशल्यांचा समाजा करिता कसा वापर करायचा व गोर _गरीब कष्टकरी,शेतकरी, यांच्या मुलांना पूर्णतः निःशुल्क आर्मी, पोलिस,भरती पूर्व प्रशिक्षण,देण्याचे त्यांनी काम हाती घेतले, सोबतच स्पर्धा परीक्षेची तय्यारी, या सर्व कार्यातून त्यांचे बरेच विद्यार्थी सैन्यात, पोलिस, एअर इंडिया,एवढेच नाही तर इस्रो सारख्या संस्थेत चांगल्या पदावर गेले, या कार्या सोबतच त्यांनी लहान मुलांना गावच्या ZP शाळेत सायंकाळी जवळजवळ 100 विद्यार्थांना पहिली ते दहावी स्पर्धा परीक्षेची विशेष तय्यारी करणारा त्यांचा विशेष अभियान सुरू आहे, या व्यतिरिक्त गावात विविध सामाजिक उपक्रम राबवणे, ग्राम स्वचता,मेडिकल कँप, स्वतः योग शिक्षक असल्या मुळे गावात दर वर्षी 7 दिवस योग सप्ताहाचा आयोजन करणे असे विविध सामजिक उपक्रम राबवित असतात,, या कार्याची पोच पावती म्हणून त्यांना 2023 बेस्ट "सोशल वर्कर*म्हणून , "अण्णाजी कुलकर्णी सेवा "गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन भंडारा चे पोलिस अधीक्षक यांनी गोपिवाडा या गावाला my ideal Village म्हणून दत्तक घेतले,,
श्री, चन्द्रशेखर डोळस सर, ( माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते,संस्थापक कमांडो ग्रुप) ते आपल्या सर्व कार्याचा श्रेय आपल्या कमांडो ग्रुप व आपल्या सहकाऱ्यांना देतात ,यांच्या या विशेष कार्याला भंडारा पोलीस दल व समस्त भंडारा जिल्हा वाशियांकडून मानाचा मुजरा!


0 टिप्पण्या