Ticker

6/recent/ticker-posts

कुलरचा करंट लागल्याने महिलेचा मृत्यू

 मोहरणा येथील घटना 

पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- अनवधानाने कुलराला हात लागल्याने कुलाराचा करंट लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार(ता.२जुलै) रोजी सकाळी ८:१५ वाजता दरम्यान मोहरणा, तालुका लाखांदूर येथे उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव आशा भाष्कर चौधरी(४६) रा. मोहरणा असे आहे. लाखांदूर पोलिस तपास करीत आहेत. 
                   मंगळवारी सकाळचे सुमारास आशा सकाळचे स्वयंपाकासाठी कुलर चे खाली ठेवलेल्या टोपलीतून भाजीपाला काढण्यासाठी गेली असता. अनावधानाने चालू कुलरच्या पाण्याच्या टाकीला हात लागल्याने त्या महिलेला कुलरचा करंट लागला. करंट लागताच सदर महिला ओरडली. त्या ओरडण्याचा आवाज ऐकून मृतक महिलेच्या पतीने जाऊन बघितले असता ती कुलरच्या पाण्याच्या टाकीला चीपकलेली होती. त्यामुळे पतीने कुलाराची बटण बंद करून पत्नीला कुलारपसून दूर केले व जमिनीवर झोपवले आणि तत्काळ गावातील डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरने महिलेस तपासून मृत घोषित केले. पोलिस पाटीलाने घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व सोपस्कार पार पाडले. तथा मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत तीचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक महिलेच्या कुटुंबात पती, मुलगा व बराच आप्त परिवार आहे. मन मिळावू आशा चौधरी च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस हवालदार विलास मातेरे तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या