Ticker

6/recent/ticker-posts

आदरणीय एकनाथ (दादा ) शिंदे मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य

पंकज पाटील चित्रा न्युज

जळगाव :- जनसामान्य लोकाचं मत पत्र लिहण्यास कारण की, तुम्ही सुरू केलीली "लाडकी बहीण माझी" या योजने अंतर्गत आम्हाला तुम्ही महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला  नको.
त्या ऐवजी तू घरगुती गॅसचे दर कमी कर, घरगुती विजेचे दर कमी कर, खड्डेमुक्त असे चांगले रस्ते तयार कर,  रस्त्यावरील ट्रॅफिक,गर्दी ची समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर, सर्व रुग्णालयांमध्ये कमी खर्चात व सर्वांना एकसमान सुविधा निर्माण कर, पेट्रोल डिझेल चे दर कमी कर जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी कर, शाळेची वारेमाप वाढलेली फी, काही शाळांची मग्रुरी, मनमानी बंद कर, व सर्वांना स्वस्तात उत्तम असे शिक्षण मिळेल ह्याची व्यवस्था कर,तसेच उच्च शिक्षण स्वस्त कर, महाविद्यालयांची वाढलेली फी कमी कर, जेणे करून, तुझे भाचे मंडळी कमी खर्चात..  डॉक्टर इंजिनीयर होऊ शकतील, सर्वात महत्वाचे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळण्याची सोय कर,)होत असेल तर ...शेतकरीला शेतासाठी पाणी, वीजबिल, लागणारे साहित्य, लागणारे बी बियाणे,खते माफ कर,)ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दी वर काही तरी कर, तुझ्या भाचे आणि भाच्यासाठी नोकरी रोजगार उपलब्ध कर, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे उद्योग धंदे थांबव ..जेण करून तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही, त्यांचे आरोग्य सुखरूप राहील, 
प्रवासात जीव टांगणीला लागून प्रवास होणार नाही आणि त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील.दादा आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे.
     तूझी लाडकी बहीण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या