ह भ.प कुमावत महाराज यांचे मार्गदर्शन घेण्यात आले
पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :-पारोळा शहरात कासोदा रस्ता लगत असलेल्या टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे संस्कृतीची शिदोरीचा सप्ताहाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. दि.५ जुलै रोजी सप्ताह पाचवा दिवशी ह भ.प कुमावत महाराज यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
यावेळी कुमावत बाबां यानी सीबीएससी, कोणती इंग्लिश हे मीडियम शिक्षणासोबत संस्कृतीचे महत्त्व सांगून सकाळी उठल्यापासूनच्या संस्कारांची श शिकवण त्यांनी मुलांकडून करून घेतली. त्यामध्ये सकाळी
उठल्यापासून देवाचे नाव स्मरण करून आई-वडिल तसेच घरातील थोरां-मोठाचा नमस्कार करणे जेवणाआधी प्रार्थना, श्लोक तसेच शाळा हेच मंदिर याची जाण करून दिली, शाळेत आपण ज्ञान घेतो तर ते घेण्यासाठी आपण शाळेत येतो तर शाळेत येताना मुख्य द्वारावर नतमस्तक होऊन, भूमातेला वंदन करून आपला हात डोक्यावरून घेतलास भूमातेचा आशीर्वाद मिळतो अशी शिकवणही ह.भ.प कुमावत महाराज यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्ती पाठक यांनी केले. कार्यक्रमात टायगर इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष रविंद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील प्राचार्य, श्रीनिवास न राव, अजीम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, ऍडमिनिस्टेड विश्वास पाटील, विभाग प्रमुख र नम्रता बेडीसकर, वृषाली पाटील, क्लार्क न श्रीकांत खैरनार, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या