रूपाली मेश्राम चित्रा न्युज
औरंगाबाद :-सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने औरंगाबाद येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी पेट परीक्षा आणि अन्य मागण्यांसाठी भव्य निदर्शने करण्यात आली.
पीएचडी आणि एमफील संबंधित काही मुद्यांचा समावेश या मागण्यांमध्ये करण्यात आला आहे. तसेच, सध्याच्या पेटच्या जाहिरातीमध्ये बुद्धीझम, पत्रकारिता, संगीत, राज्यशास्त्र आणि इतिहासाच्या विषयाची एकही जागा दिली नाही.
त्यामुळे पेट परीक्षेत या विषयांना सामावून घेण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, विद्यापीठ अध्यक्ष संदीप तुपसमुद्रे, शाहीर मेघानंद जाधव, भीमराज वाघमारे, भागवत चोपडे, अक्रम खान, चंचल जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या