रुपाली मेश्राम चित्रा न्युज
औरंगाबाद :-वंचित बहुजन आघाडीच्यावतीने औरंगाबाद जिल्ह्यात ''ओबीसी आरक्षण बचाव संवाद यात्रा" काढून ओबीसी समाजातील भीतीचे वातावरण दूर करण्याचा निर्णय जिल्हा आढावा बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात ही बैठक संपन्न झाली.
यावेळी ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच, जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला.
याप्रसंगी नेते अमित भूईगळ, मराठवाडा सचिव तथा राज्य प्रवक्ते तय्यब जफर, मराठवाडा संघटक महेश निनाळे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, जिल्हाध्यक्ष योगेश बन, मिलिंद बोर्डे, अफसर खान, पंकज बनसोडे, जलीस अहमद, रामदास वाघमारे, रुपचंद गाडेकर, प्रवीण जाधव, रवि रत्नपारखे, शाहीर मेघानंद जाधव, रोहन गवई, पंडितराव तुपे, अंजन साळवे, वैशाली राणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या