हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
सांगली:- येथे एका कार्यक्रमात शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या समस्यांवर चर्चा केली आणि काही मुद्दे स्पष्ट केले. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना त्यांचे कान टोचत काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
शरद पवार म्हणाले, "एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखान्याला घालवायचा. शेतकरी उसाकडे लक्ष देतो आणि जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो, पण शेतीच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाही. हे बदलले पाहिजे. जमिनीतला पोत सुधारण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी हाती घेतला पाहिजे."
पवार यांनी शेतकऱ्यांना सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर न करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, "सरकारनें वीज फुकट देण्याचे जाहीर केलंय, त्यामुळे आता मोटर बंद करायला कोण जाईल काय? अशा सवलतींचा गैरवापर होऊ नये."
शरद पवार यांनी शेतकऱ्यांना शेतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि या उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.
शरद पवार यांच्या या मार्गदर्शनामुळे सांगलीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात सुधारणा करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.


0 टिप्पण्या