विजय चौडेकर चित्रा न्युज
नांदेड :-इंग्रजी, सेमी माध्यम व सीबीएससी पॅटर्नच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्याध्यन्नित खाजगी संस्थाचालक आर्थिक व मानसिक त्रास देऊन विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करीत आहेत, ही आर्थिक लूट बंद करा, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे मा. उपजिल्हाप्रमुख (उबाठा) रवी हाटकर यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना दिले.
नांदेड जिल्हयात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात, परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संस्थाचालक हे विद्यार्थ्यांकडून डायरी फिस या नावाने ३०००/- रूपये वसूल करीत आहेत. तीन हजार रूपयांचे लिफाफ्यामध्ये दिलेल्या पत्रावर स्कॅनर पाठवून आपल्या आई- वडिलांना दाखवा आणि पैसे पाठवा, ही डायरी घेणे सक्तीचे आहे. ही डायरी न घेतल्यास तुम्हाला सीक्षेस बत्तू देणार नाही आणि शाळेला येऊ देणार नाही असे, संस्थाचालक व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना धमकावत आहेत.
तसेच या शाळांची पुस्तके, ड्रेस, बुट, सॉक्स व इतर साहित्य हे त्यांनी ठरवून दिलेला दुकानांवरूनच खरेदी करावे लागते, कारण प्रस्तुत दुकानदार हा संस्थाचलकांना भरघोस कमिशन देतो. त्यामुळे अशा खाजगी शाळांवर त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा या शाळांच्या कृत्वाबाबत आपल्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करून, आमरण उपोषणास बसण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे शिवसेनेचे मा. उपजिल्हाप्रमुख (उबाठा) रवी हाटकर यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना दिला आहे.


0 टिप्पण्या