Ticker

6/recent/ticker-posts

मजूर हजेरी पत्रकावीणा सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू...!


• दिघोरी/ना. ग्रामपंचायतीचा अफलातून कारभार 

• व्यथा- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत आधी मजूर मागणी नंतर कुशल किंवा अकुशल कामास सुरुवात करावी. अशी कायद्यात तरतूद असली तरी यास बगल देऊन दिघोरी/ना. स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांनी मजूर हजेरी पत्रकावीणाच सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आल्याने दिघोरी/ना. ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याने रोजगार सेवकासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे झाले आहे. 
                         दादा कुळमते ते राधेश्याम निरगुळे यांचे घरापर्यंत मातीचा रस्ता असल्याने पावसाळ्यात चिखल होत असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. ग्रामपंचायतीचे मागणी वरून पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दादा कूळमते ते राधेश्याम निरगुळे यांचे घरापर्यंत २३ लाख १३ हजार रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामास गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांनी मंजुरी प्रदान केली होती. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम तांत्रिक अधिकारी(कृषी) गिरिधर मेश्राम यांचेसह कनिष्ठ अभियंता संदीप महाकाळकर यांचेकडे सोपविण्यात आले होते. 
                           करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असला तरी टक्केवारीने हे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम एका कंत्राटदारास दिले आहे. नियमाप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर काम सुरू करायचे असल्यास आधी मजुरांचे मागणी नुसार मजूर हजेरी पत्रक तयार करून कामावर कार्यरत मजुरांची ऑनलाईन हजेरी घेणे बंधनकारक असले तरी दिघोरी/ना. ग्रामपंचायत द्वारा मागील ४ ते ५ दिवसापासून सुरू असलेले सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम मजुर हजेरी पत्रकावीणाच सुरू असल्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने दिघोरी/ना. ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मजूर हजेरी पत्रकाबाबद रोजगार सेवक तुळसीदास हलमारे यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता मस्टर(मजूर हजेरी पत्रक) काढले नसल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या