Ticker

6/recent/ticker-posts

आधार लिंकहोत नसल्याने वयस्क मंडळी योजनांपासुन होणार निराधार


हाळी परिसरात व्यक्त होतोय संताप..


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर  :-शासनाच्या अनेकविध योजनासाठी आधार कार्ड अनिवार्य असुन,सध्या राशन दुकाणदार कार्ड वरील नावांच्या सदस्यांचे आधारकार्ड लिंक (थंब घेताना) करुन घेताना दिसतात.तसेच जो कुणी लिंक करत त्याचे तसेच प्रयत्न करुनही ज्याचा अंगठ्याचे ठसे उमटत नाहीत.अशा व्यक्तींच्या नावाचे राशन मिळणार नाही.असे बोलले जाते.तर अनेक वयस्कर मंडळींच्या "अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने त्यांना राशन मिळेल कसे" असा प्रश्न उपस्थित असुन,ठसे उमटत नसल्याने वयस्कर मंडळीमध्ये संताप पसरला असुन,आधारविना शासकिय योजनांपासुन अनेकांना निराधार व्हायची वेळ तर येणार नाही ना.अशी भीती व्यक्त केली जात आहे
           शासनाच्या अनेक योजनांना आधार कार्ड असणे ते पण अपडेट असणे अनिवार्य आहे.माञ ब-याच वयस्कर मंडळीच्या अंगठ्याचे ठसे प्रयत्न करुन उमटत नसल्याने पुरावा म्हणुन जन्माचा दाखला अनिवार्य केला आहे.माञ,बहूतांश मंडळींकडे जन्म दाखला ही नसल्याने आधार लिंक/अपडेट करणे सध्यातरी कठीन बनले असुन,या सर्व प्रक्रियेतुन सुट द्यावी,आणी केवळ थंब मशीनवर अंगठा उमटेना म्हणुन शासकिय योजनेपासुन वंचित राहू नये,यासाठी ग्रा.पं.रहिवाशी प्रमाण पञ किंवा अन्य सुलभ असलेली प्रक्रिया हवी.
अन्यथा फक्त ठसे उमटत नाहीत.या मुळे वयस्करांना वंचित ठेवू नये.अशी माफक अपेक्षा वयस्करांची आहे .
सरकार समाजातल्या सर्व घटकांना अनेकविध सोयी-सुविधा देते.तसेच अनेक प्रकारचे अनुदान ही देते.माञ हे देताना घेणा-यांचे आधार अपडेट असणे बंधनकारक आहे.आणी सध्या राशन दुकाणदार दारोदारी जातात व कार्डावरील बालकांपासुन ते वयस्कर मंडळी यांचे आधार क्रमाक नुसार रेशनकार्डवरील सदस्यांच्या अंगठे घेतात.व ज्यांचे अंगठे उमटत नाहीत, अशांना यापुढे धान्य मिळणार नाही ! असे म्हणतात.आणी शेकडो वयस्कर मंडळींचे ठसे उमटत नसल्याने अशी मंडळी चिंता व संताप व्यक्त करित आहे.सरकारी कामांसाठी ओरिजनल व मेन पुरावा म्हणुन आधार अनिवार्य केले आहे.त्यात विविध योजनांचा लखलाभ करुन घ्यायचा असेल तर
आधार ते पण अपडेट / लिंक केलेले हवे.अन्यथा अनेकविध रमस्या तयार होऊ शकतात.यात अनेकांना केवळ आधार अपडेट नसल्याने शासकिय योजनांपासुन निराधार व्हावे लागणार आहे.आणि ज्यांचा ठसा उमटत नाही
अशा वयस्कर मंडळींनी जन्म दाखल सादर करावा लागतो.एकंदरीत सध्या राशन दुकाणदार राबवित असलेली आधार अपडेट ही मोहिम वयस्करांना "हेडॅक" ठरत आहे.७० , ८० वयाच्या
अनेकांच्या जन्माची नोंदच नसल्याने एकतर टी.सी. किंवा ग्रा.पं.रहिवाशी हे ग्राह्य धरावे,अन्यथा म्हतारपणात जन्माचा दाखला आणावा कसा व कुठून असा प्रश्न जेष्ठांना सतावतोय. तसेच म्हतारपणात उमटेनात ठसे , आधारकार्ड अपडेट करावे कसे.या विचारात असलेला वर्ग ञस्त आहे ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या