Ticker

6/recent/ticker-posts

साथीच्या आजाराची साथ होऊ नये यासाठी जनतेनी काळजी घ्यावी ; हंडरगुळीचे एम.ओ.डाॅ. वामन राठोड यांचे आवाहन ...


 विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-सध्या पावसाळ्याचे दिवस असुन,या
ठिकाणच्या प्रा.आ.केंद्रात साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याचे चिञ दिसत आहे.
आणि सर्वप्रकारच्या रुग्णांनी प्रा.आ. केंद्रात तत्काळ तपासणी करुन घ्यावे तसेच डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावे,असे आवाहन M.O.डाॅ.वामन राठोड यांनी केले आहे .
सध्या पावसापाण्याचे दिवस आहेत.
व गत कांही दिवसापासुन वातावरणा मध्ये बदल झाल्याने सर्दी,फडसे,कफ डेंगू,मलेरिया,टायफाईड,डायरिया व हिवताप,हागवग या सारखे साथीचे आजारांनी अनेकांना"भंडावुन"सोडले असल्याचे वाढत्या रुग्णांकडे बघून म्हणावेसे वाटते.यात जेष्ठ व नवजात, लहान बालकांनाही साथीने ग्रासले असुन,हंडरगुळीच्या प्रा.आ.केंद्रामध्ये एम.ओ.डाॅ.वामन राठोड,फार्मासिस्ट एस.बी.राऊत,रामचंद्र किनवाड H.A
बेलुरकर,ओमप्रकाश भातीकर Lab
व भारत पी.कसबे हे कर्मचारी 24x7
डे-नाईट सेवा देत असल्याने रुग्णांत समाधान पसरले आहे.माञ सध्या थंड-गरम असे " अजब-गजब " वातावरण निर्माण झाल्याने हाळी व परिसरातील जनतेनी डेंगू,मलेरिया, टायफाईड,सर्दी,फडसे,ताप,अंगदुखी व संडास,उलटी,खोकला यासारखे आजार होणार नाहीत,यासाठी नेहमी सरकारी दवाखाण्यात येऊन तपासुन घ्यावे.तसेच कोमट व उकळलेलेच पाणी प्यावे,उघड्यावर अन्न पदार्थ ठेवू व खाऊ नये,पालेभाज्या स्वच्छ पाण्याने धुवून व निटनेटक्या करुनच खावे,जेष्ठ व नवजात बालकांची विशेष काळजी घ्यावी.असे आवाहन डाॅ.वामन राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले..
*कर्मचा-यांची संख्या वाढवावी*
———————————————
"रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा" असे म्हणत २४x७ मुक्कामी राहणारे M.O.वै.अ.डाॅ.वामन राठोड सह राऊत,कसबे,किनवाड,भातीकरे इ. कर्मचारी हे रुग्णांची काळजी घेतात, म्हणुन येथे दैनंदिन O.P.D / i.p.d. रुग्णांची संख्या वाढली आहे.म्हणुन सध्या असलेल्या कर्मचा-यांचा भार वाढला असुन , कर्मचा-यांची अपुरी असलेली संख्या पुर्ण करावी आणी नवीन कर्मचा-याची भरती करावी.अशी मागणी जोर धरीत आहे.
तसेच "साथीच्या आजाराची साथ होऊ नये तसेच ती साथ कायमची सोडण्यासाठी" जनतेनी दक्षता घ्यावी व प्रा.आ.केंद्रात तपासणी करुन योग्य तो उपचार घ्यावा.असे डाॅक्टर वामन राठोड म्हणाले ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या