Ticker

6/recent/ticker-posts

17 ऑगस्ट रोजी वसमत बंद ला व्यापारी महासंघाचा पाठिंबा


 दिवसभर बाजारपेठ रहाणार बंद

शिवतीर्थावरून निघणार मोर्चा

मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-बांगलादेश येथील हिंदुवर होणारे अत्याचार थांबावे...बांगलादेश येथील हिंदूंची यातुन सुटका व्हावी..तसेच हिंदु धर्मावर वाढते धर्मांतरण यासाठी जागतिक स्तरावर हिंदुस्थान सरकारकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हिंगोली-नांदेड-परभणी जिल्हा पुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.
  यात वसमत तालुक्यात सुध्दा दि.17/08/2024 रोजी संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
  तरी वसमत तालुक्यातील ग्रामीण भाग,शहरातील सर्व हिंदु बांधव ,भगिनी,महिलांनी या मोर्चात सहभागी व्हावे व बाजारपेठ दिवसभर बंद ठेवावी  असे आवाहन सकल हिंदु समाज वसमतचा वतीने करण्यात आले आहे.
  या बंदला हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे.तसेच वसमत व्यापारी महासंघाने सुद्धा पाठिंबा दिला असुन यात कपडा,भुसार,आडत,सराफा,इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रिक,किराणा सह इतर व्यापारी संघटनेचा पाठिंबा दर्शवला आहे.तरी दिवसभर त्यानी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहिर केले आहे.यामुळे वसमत तालुक्यातील सर्व बाजारपेठ बंद रहाणार आहे.

 17 तारखेला सकाळी 11 वा.शिवतीर्थ छ.शिवाजी महाराज पुतळा परिसर येथुन मोर्चा निघून मोंढा रोड-मामा चौक-झेडा चौक-पोलीस स्टेशन-गवळी मारोती मंदिर-तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या