आरोपीला पोक्सोअंतर्गत अटक
आरोपी गोंदियातील, पिडीता भंडारा जिल्ह्यातील तर लॉज साकोली येथील
रवी भोंगाने साकोली
साकोली : गोंदिया जिल्ह्यातील आरोपीकडून भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी जवळीक साधला. व साकोली येथील एका लॉजवर तिच्यावर अत्याचार केला. यातूनच ती ५ महिन्याची गर्भवती राहिली. वैद्यकीय चाचणीत हा प्रकार उघड झाल्याने मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलीसांनी आरोपी विरुद्ध विविध कलम लावून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पोलीसांतर्फे आलेल्या माहितीनुसार लाखनी तालुक्यातील १२ वीची अल्पवयीन मुलगी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे नातेवाइकांकडे वाढदिवसाकरिता गेली असता एका समारंभात तिची विनोद सुरेश गळे वय २९ याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. तो त्या विद्यार्थीनीला भेटण्यास तिच्या शाळेत येऊन भेटत असे. यातच एकदा दुचाकीने साकोलीतील एका लॉजवर नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या पोटात त्रास होत असल्याने तिच्या आई वडिलांनी लाखनीतील खासगी रुग्णालयात तपासणी केली असता ती ५ महिन्याची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासात आढळले. पीडिता अल्पवयीन असल्याने व घटनास्थळ साकोली असल्याने येथील पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलीसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली आहे.
लॉज मालकाविरुद्ध कारवाईची मागणी
साकोली येथे बरेच लॉज व गेस्ट हाऊस आहेत. येथील काही लॉजवर अशाच प्रकारचे गैरकृत्य केले जातात. आणि बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पण नाहीत. मागेही वडद ता. साकोली येथील एका ७ वीत शिकणाऱ्या मुलीवर सुद्धा साकोलीतील एका लॉजवर नेहमी नेहमी अत्याचार प्रकरण गाजले होते. केवळ पैशे कमविण्यासाठी अशा प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या व साकोली शहरात अश्लील प्रकाराला थारा देणा-या संबंधित लॉज मालकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्याची मागणी महिला जनतेकडून पुढे येत आहे. व पोलीस विभागाने शहरातील संपूर्ण लॉज गेस्ट हाऊसची तपासणी करावी आणि सर्वांना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करावेत अशीही मागणी जागृत जनतेने केली आहे.
0 टिप्पण्या