Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ -  २७ ऑगस्ट 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
‌भा. रा. ६ भाद्रपद १९४६
युगाब्द ५१२६       
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : वर्षा
मास: श्रावण
पक्ष: कृष्ण   
तिथी: नवमी  (२५.३०) ~ दशमी                
वार:   मंगळवार
नक्षत्र: रोहिणी (१५.४०) ~ मृग        
राशी:   वृषभ (२७.४०) ~ मिथुन 

*मंगळागौर पूजन*
*गोपाळ काला*

१९३९:सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन यांनी शोध लावलेल्या Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.
१९६२: नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान
१९६६ : नाट्यसंपदा निर्मित, वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.
१९७२: वन्यजीव संरक्षण कायदा संमत.
१९९१: मोल्डोव्हाने (सोविएत युनियनपाससून) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९९९: कारगिल संघर्षाच्या वेळी भारताने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कैद्यांना सोडून दिलं.
१९९९: सोनाली बॅनर्जी या देशातील पहिल्या सागरी अभियंता बनल्या.

जन्मदिवस :
१८५४:गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे (वर्‍हाडचे नवाब) – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, 
१८५९: उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा
१८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स 
१९०८: अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन 
१९०८: ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन. १९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला. 
१९१०:सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 
१९१६: रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड 
१९१९:वि. रा. करंदीकर – संतसाहित्याचे अभ्यासक तसंच, राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व मराठी ज्ञानकोशाचे संपादक. 
१९२५:नारायण धारप – रहस्यकथाकार  व लेखक आणि नाटककार.
१९३१: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोष उर्फ श्री चिन्मोय
१९७२: दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतीय व्यावसायिक मल्ल.
१९८०: नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री
 
मृत्यूदिन :
२००६:हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक 
२०००:मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध७८८९ भूमिका केलेल्या अभिनेत्री 
१९९५:मधू मेहता – हिन्दुस्तान आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते 
१९७९:ब्रिटीश कालीन भारतातील शेवटचे व्हॉईसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल तसंच , भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करणारे लॉर्ड माउंटबॕटन यांचा आयरीश क्रांतिकारकांनी केलेल्या बाँब स्फोटात मृत्यू. 
१९७६:मुकेश चंद माथूर तथा *‘मुकेश‘* – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराती या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेला ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. 
१९५५:जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या ’महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते.

*।। दास-वाणी ।।* 

आकाश आणि पाताळ । 
दोनी नामे अंतराळ । 
काढिता दृश्याचें चडळ । 
अखंड जालें  ।। 

तें तों अखंडचि आहे । 
मन उपाधी लक्षून पाहे । 
उपाधीनिरासें साहे । 
शब्द कैसा  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १५/१०/२०-२१ 

वरती आकाश खाली पाताळ असे आपण म्हणतो. वस्तुत: दोन्ही अंतराळ म्हणजे पोकळी किंवा आकाशच. या दोन्हींच्या मधे दृश्य सृष्टीचे मायिक चडळ म्हणजे पडदा आहे. दृश्य जगताचा निरास होताच आकाश पाताळ हा भेद मिटून जातो आणि एक अखंड अंतराळ किॆवा आकाश शिल्लक रहाते.

वस्तुत: अंतराळ हे अखंडच आहे. परंतु मानवी मनाला दृष्य सृष्टीच मोहून टाकते. तो या दृष्यामधेच हरखून जातो. गुरफटून राहातो. दीर्घकालीन साधनेअंती जेव्हा साधक या दृष्य उपाधीचा मिथ्या म्हणून निरास करतो. मध्यस्थित दृष्य वितळून जाते तेव्हा आकाश आणि पाताळ या दोन शब्दांनाही काही अर्थ उरत नाही. अवकाश म्हणजे अंतरात्मा हाच नित्य अन् चिरंतन आहे, हा सिद्धांत होय.

*सिद्धांतनिरूपण समास.*

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या