साकोली पोलीसात तक्रार
रवी भोंगाने साकोली
साकोली :डॉ. सोमदत्त ब्रह्मानंद करंजेकर यांचा 902XXXXO32 या फोन नंबरवरून बनावट सोशल मिडीयाचे व्हाट्सअप खाते बनविण्यात आल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. या बनावट व्हॉट्सऍप अकाउंट बनवलेल्या व्यक्तीने डॉ. सोमदत्त करंजेकर यांचे छायाचित्रही "परीचय फोटो" म्हणून वापरला आहे. यादरम्यान जनतेची दिशाभूल होऊ नये आणि लोकजन समाजात सुरक्षितता रहावी यासाठी पोलीस ठाणे साकोली येथे आज सोमवार २६ ऑगस्टला अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तयार करण्यात आलेल्या या बोगस खात्यात "डॉ. सोमदत्त करंजेकर फॅन क्लब.apk’ नावाची एक फाईल देखील या नंबर वरून साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील लोकांच्या दूरध्वनीवरून पाठविण्यात येत आहे. या क्रमांकाचे "मुळ मालक धारक" वर निळकंठ पाटील असे नाव दिसत असून सदर नंबर वर संपर्क केला असता ही व्यक्ती खामगाव तालुका जि. बुलढाणा येथील असल्याचे कळले. डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी याबाबतची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात व साइबर क्राईमला केली. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी डॉ. सोमदत्त करंजेकर हे साकोली मतदारसंघातील प्रबळ दावेदार आहेत. जनतेची कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये याकरिता पोलीस स्टेशन साकोली व सायबर क्राईम भंडारा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत साकोली पोलीसांनी अगदी तडकाफडकी कारवाईची भूमिका घेतली असून हे बोगस खाते बनविण्यासाठी कुठे कुठे धागेदोरे गेलेले आहेत याचा आता पोलीस विभागाने "सी आय डी" स्टाईलने तपास सुरू केला असल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे.


0 टिप्पण्या