Ticker

6/recent/ticker-posts

गोठयात शिरून बिबट्याने केली शेळ्यांची शिकार

मडेघाट, ता. लाखांदूर येथील घटना

गावात भीतीचे वातावरण 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवाफ मध्यरात्रीचे सुमारास बिबटाने हल्ला करून २ गर्भवती शेळ्या ठार केल्याची घटना रविवार(ता.१८ ऑगस्ट) रोजी घडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव सूर्यकांत रामकृष्ण गदरे(४०) व रामकृष्ण सदाशिव गदरे(६५) असे आहे. वनरक्षक जी.एस. पवळे यांनी पंचनामा केला असून पशू पालकाचे २७ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे मडेघाट आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबटाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
                    धान शेती परवडेनासी झाल्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काही शेतकरी पशू पालनाचा व्यवसाय करतात. त्यात गायी, म्हशी व शेळी पालनाचा समावेश आहे. अत्यल्प भूधारक सूर्यकांत गदरे व रामकृष्ण गदरे यांनी शेळी पालनास सुरुवात केली आहे. रविवारी दिवसा शेळ्या चारून आणल्यानंतर रात्री चारा पाणी करून गोठ्यात बांधल्या व गदरे कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिबट्या गावात आला व त्याने सूर्यकांत गदरे व रामकृष्ण गदरे यांच्या गोठ्यात शिरून शेळ्यांवर हल्ला केल्याने २ शेळ्या गर्भवती ठार झाल्या. सोमवारी सकाळी गोठ्यातून शेळ्या बाहेर काढण्यासाठी गदरे गेले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना देण्यात आली. वनरक्षक जी. एस. पवळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तथा पशू वैद्यकिय अधिकारी लाखांदूर यांना शव विच्छेदनासाठी पाचारण करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे २७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गोठ्या सभोवताल आढळलेल्या पगमार्क वरून बिबट असल्याचे निष्पन्न झाले. मृत शेळ्यांना जमिनीत पूरण्याच्या सूचना करण्यात आल्या. या घटनेने मडेघाट आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचनामा करतेवेळी चेतन आलोने, ऋषेंद्र ठाकरे, महेश मडावी व गावकरी उपस्थित होते. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या