भटु यशोद तालुका प्रतिनिधी मालेगाव जिल्हा नाशिक
मालेगाव :- तालुक्यातील चिंचगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा या वेळी बहुसंख्य गावकरी व महिलांसहित अबाल व्रुद्धांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला. सदर वेळी सरपंच, उपसरपंच, व त्यांचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व त्यांचे सदस्य, सभासद ग्रामस्थ तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटनेचे संकल्पना संस्थापक प्रदेश महासचिव देविदास यशोदा प्रदेश अध्यक्ष गोविंदा बोराळे तसेच सरपंच महेंद्र शिसोदे ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवि मांडवडे , विविध सरकारी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते गावात प्रभातफेरी काढून ग्रामपंचायत कार्यालय व सेवा सोसायटीचे कार्यालयचे ध्वजारोहण करणेत आले नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या व विर एकलव्य पुतळ्याचे समोर शालेय मुलांनी कवायत व न्रुत्य सादर केले...


0 टिप्पण्या