सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर चित्रा न्यूज
रामटेक :- स्थानिक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड. व डी.एड. कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट तथा प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोज गुरुवारी महाविद्यालयातील प्रांगणामध्ये जयश्रीताई देशमुख यांच्या शुभहस्ते महामानव व क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट सर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मार्चपास, देशभक्तीपर गीत, भाषणे सादर केले. तसेच हर घर तिरंगा या अभियानातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली यातून पूर्ण महाविद्यालयाचा प्रांगण प्रफुल्लित झाला.
याप्रसंगी बी.ए. प्रशासकीय च्या विभागप्रमुख प्रा.चेतना उके, बी.एड. विभागप्रमुख प्रा. उर्मिला नाईक, डी.एड. विभागप्रमुख प्रा. शालू वानखेडे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. देवानंद नागदेवे, प्रा.नितीशा घोडेस्वार, प्रा.आकाश मोहबिया, बी.ए. प्रशा. NAAC समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर नेवारे, बी.एड. NAAC समन्वयक प्रा. किरण शेंद्रे, तसेच इतर प्राध्यापक - प्रा. कला मेश्राम, प्रा.अमित हटवार, प्रा. अनिल मिरासे, प्रा. विलास मडावी, प्रा. मयुरी टेम्भुरने, अतुल बुरडकर, राजेंद्र मोहनकर, गीता समर्थ, सुरेश कारेमोरे, निकिता अंबादे, सतीश कळंबे, सुनील पोटभरे, स्नेहा गाथे, आरती कुथे, संदीप ठाकरे इत्यादिसह मोठ्या संख्येत माजी विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या