🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - २० ऑगस्ट
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. २९ श्रावण १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : वर्षा
मास: श्रावण
पक्ष: कृष्ण
तिथी: प्रतिपदा (२०.३०) ~ द्वितीया
वार: मंगळवार
नक्षत्र: शततारका (२७ .१०) ~ पूर्वभाद्रपदा
राशी: कुंभ
*मंगळागौर पूजन*
*श्री सिद्धारूढ स्वामी पुण्यतिथी* (कर्नाटक)
लोकशाही दिन
राष्ट्रीय सद् भावना दिवस
*अक्षय ऊर्जा दिन*
जागतिक मच्छर दिन
१६६६: शिवाजी महाराजांनी दख्खन मध्ये येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे बनावट दस्तऐवज दाखवून शिताफीने ओलांडले.
१८२८: राजा राम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता येथे ब्राह्मो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे ’ब्राह्मो समाज’ म्हणू लागले.
१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला. आल्मोडा येथे मलेरियावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.
१९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे, जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (News Radio 950 WWJ) सुरू झाले.
१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली. यातल्या ज्यूंना छळ छावण्यात रवाना करण्यात आले.
१९८८ : इराण इराक युद्धात सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.
१९९५ : फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ लोक ठार. अनेक जखमी.
२००८: भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
जन्मदिवस
१९४०: पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसंच, शांततेचा नोबल पुरस्कार विजेते भारतीय हवामान बदलांच्या पॅनेलचे अध्यक्ष राजेंद्र कुमार पचौरी
१९४४: राजीव गांधी, पूर्व प्रधानमंत्री. भारतरत्न (१९९१) मरणोत्तर.
१९४६: एन. आर. नारायण मूर्ती, , इन्फोसिसचे सह संस्थापक
१९८६: अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महिला बुद्धिबळपटू तानिया सचदेव.
मृत्यूदिन
१९१४: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उडिया भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार गोपीनाथ महंती.
१९८४: रघुवीर भोपळे तथा सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार‘ व ‘मी पाहिलेला रशिया‘ ही पुस्तके लिहिली आहेत.
१९८६ : हरचरणसिंह लोंगोवाल, अकाली दलाचे अध्यक्ष यांची शेरपूर येथे एका गुरूद्वारात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली.
१९८८: माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. ’कन्यादान’, ’धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ’शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांचे मायेचा पाझर, संसार (उर्मिला मातोंडकरचा पहिला चित्रपट) हे चित्रपट प्रसिद्ध आहेत.
२००१: मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष
२०१३ : डॉ. नरेंद्र दाभोळकर, अंनिसचे संस्थापक
२०१३ : जयंत साळगांवकर, ज्योतिर्भास्कर, काल निर्णयचे संस्थापक, लेखक, उद्योजक
२०१४: बी. के. अय्यंगार, सुप्रसिद्ध योगाचार्य
*।। दास-वाणी ।।*
देहमात्र अस्तिमांशाचें ।
तैसेंचि जाणावे नृपतीचें ।
मुळापासून सृष्टीचें ।
तत्वरूप ।।
रायाचे सत्तेनें चालतें ।
परंतु अवघी पंचभूतें ।
मुळी अधिक जाणीवेचे तें ।
अधिष्ठान आहे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १५/०३/०३-०४
जीवसृष्टीतील लहान मोठी सर्वच शरीरे ही हाडामांसाचीच बनलेली असतात. सैनिक काय किंवा राजा काय, शरीर रचना सारखीच रस रक्त अस्थि मांस मज्जादि सप्तधातूंची घडलेली असते.
एकंदरीत सर्व सृष्टी पंचमहाभूतादिक तत्वांचे मिश्रण आहे.
राजा उंच सिंहासनावर बसतो. दुतर्फा रांगेमधे हजारोंची फौज उभी असते. राजाच्या सत्तेने सैन्य चालते परंतु दोघांचे शरीर पंचभौतिकच आहे. फरक इतकाच की राजाकडे 'सत्ता'
हे अधिक तत्व आहे. त्याचप्रमाणे जरी मायिक असला तरी ईश्वराकडे अधिक जाणीवेचे अधिष्ठान असते. या शुद्ध सत्वगुणी जाणिवेच्या आधारावर ईश्वरी सत्ता जीवसृष्टीवर नियंत्रण करते.
*श्रेष्ठअंतरात्मानिरूपण समास.*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐 💐 🙏
0 टिप्पण्या