सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :- सिद्धार्थ नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विविध शालेय समितीचे पुनर्गठन सभेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मोटे सर व इतर शिक्षक वर्गांनी सभेचे आयोजन केले होते.यावेळी सभेचे अध्यक्षस्थान शिवा आप्पा घोडके यांना देण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना शेळके मॅडम यांनी केले तसेच सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक मोटे सरांनी केले.या सभेत शाळा सल्लागार समिती,बांधकाम समिती,परिवहन समिती,सखी सावित्री समिती,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,शालेय पोषण आहार समिती,विशाखा समिती या समितीची सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य म्हणून पालकांची,शिक्षकांची,समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची,स्थानिक स्वराज्य संस्थेवर कार्यरत असणारे नगरसेवकांची,प्रसार माध्यमांची विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांची भाषणे झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाप्पा घोडके,नगरसेवक हृदय भाऊ घोडके,माजी नगरसेवक अनिल भैय्या ससाने,जिवाजी अध्यक्ष घोडके,सुनील काशिनाथ घोडके,गोरख तात्या घोडके, भारत भाऊ घोडके,अन्य मान्यवरांची भाषणे झाली.
शाळेच्या प्रगतीसाठी विकासासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर चर्चा विनिमय करण्यात आला,तसेच मुलांच्या गुणवत्तेबाबत सर्व पालक वर्गाने शिक्षक वृंद यांचे मनापासून आभार व्यक्त केले,शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावी,राष्ट्रीय महामार्ग 548 डी येथे गतिरोधक फलक लावण्यासाठी चर्चा करण्यात आली,मुलांच्या आहाराबद्दल चर्चा करण्यात आली.आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली..
या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉ.संतोषजी घोडके,लक्ष्मणजी घोडके,संदीप उमाप,भगवान घोडके,जितेंद्र पाटोळे,बजरंग घोडके,संदीप ससाने,बाळू ससाने,विशाल घोडके,भाऊ अंकुश घोडके,आनंद घोडके, जितेंद्र ससाने,भिका ससाने,प्रवीण घोडके,श्रीकांत घोडके,नंदू लक्ष्मण ससाने, अक्षय नंदू ससाने, बंटी घोडके,गणेशजी घोडके,चंपालाल घोडके,निखिल घोडके,ससाणे नगर व सिद्धार्थ नगर मधील महिला,पालक,नागरिक,पदाधिकारी,शिक्षक वृंद उपस्थित होते.


0 टिप्पण्या