Ticker

6/recent/ticker-posts

पालोरा येथील रमणीय शेत व फार्म हाऊस ला ज्येष्ठ नागरिक व मित्रांनी भेट देऊन निसर्ग व पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला


हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
भंडारा:- येथील प्रगतिशील शेतकरी  रुपेश टांगले यांच्या लोहारा स्थित शेत, फार्म हाऊसला सीनियर सिटीजन आणि मित्र परिवारांनी भेंट देवून निसर्ग सौंदर्य व पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला. भंडारा पासून वाया ज.नगर  सुमारे 20 कि.मी. अंतरावर असलेल्या निसर्गरम्य कन्हान नदीच्या काठी हिरव्यागार शेत व फार्म हाऊस येथील 12 एकर शेतात मानाने डोलणारे सागवान ची 3 हजार झाडांची नर्सरी, शेतातील विविध भाजीपाला ,कुक्कुटपालन केंद्र, आधुनिक पद्धतीची शेती, गिरगाय इत्यादी बाबत रुपेश टांगले कडून ज्येष्ठ नागरिक व मित्रांनी  योग्य ती माहिती प्राप्त केली. शेतात निरीक्षण नंतर काही लोकांनी स्विमिंग टॅंक इथे पोहोण्याच्या मनसोक्तपणे आनंद लुटला. या टूरमध्ये शामिल ८२ वर्षीय श्याम कुकडे यांनी तर चक्क डाई वर डाई मारून,चित्त थरारक पणे पोहून सर्वांना चकित करून दिले.
या टूरमध्ये श्याम कुकडे ,अतुल वर्मा ,रुपेश टांगले, सईद शेख, वामन गोंघुळे, डॉ.बाळकृष्ण सार्वे, अनिल शेंडे, ललित बीसेन,  प्रा.गुरुप्रसाद पाखमोडे, पुरुषोत्तम समरीत ,शामराव सार्वे, पुरुषोत्तम वैद्य, संजय मोहतुरे, पुरुषोत्तम साकुरे, सेवक हातझाडे ,मोटघरे, बंडू गंथाळे इत्यादी चा समावेश होता. येथील शांत व रमणीय वातावरणात काही क्षण व्यतीत करणे म्हणजेच एक आगळेच आनंद प्राप्त होते असे मनोगत येथील ज्येष्ठ नागरिक व मित्रांनी व्यक्त केले. स्वादिष्ट भोजनानंतर सर्वांनी आपल्या गंतव्य स्थळी प्रस्थान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या