Ticker

6/recent/ticker-posts

मुरमाडी येथील विद्युत पुरवठा नियमित करा

• बसपा चे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज 
भंडारा :- लाखनी शहरालगत असलेल्या मुरमाडी येथील कुमार पेट्रोल पंप परिसरातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून नियमित विद्युत पुरवठा करण्यात यावा. या करिता बहुजन समाज पार्टीचे वतीने उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लाखनी ग्रामीण यांना सोमवारी(ता.२६ ऑगस्ट) रोजी निवेदन देण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीकडून काय कार्यवाही केली जाते याकडे व्यवसायिकांचे लक्ष लागले आहे. 
                        मुरमाडी/सावरी कुमार पेट्रोल पंप परिसरात व्यापारी प्रतिष्ठान, किरकोळ दुकानदार इतर व्यवसायिक व ऑनलाईन काम करणारे व्यवसायिक प्रतिष्ठान आहेत. पण अपुऱ्या खंडित वीज प्रवाहामुळे व्यवसायिकांना अकारण त्रास सहन करावा लागत असून नुकसान होत आहे. या परिसरातील विद्युत सयंत्र सुव्यवस्थित करून वारंवार निर्माण होणाऱ्या विद्युत विषयक तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्या. या करिता वीज वितरण कंपनीस वारंवार सूचना व तक्रार अर्ज दिले. पण काही उपयोग झाला नसल्यामुळे व्यवसायिक आक्रोशित झाले आहेत. असे निवेदनात नमूद आहे. कुमार पेट्रोल पंप परिसरातील वीज पुरवठ्याची समस्या व्यवस्थित करून द्यावी. अन्यथा या परिसरातील व्यापारी आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कंपनीवर राहील. 
                       आपली जबाबदारी समजून कुमार पेट्रोल पंप परिसरातील विजेचा प्रश्न गंभीर करून समोर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आपणास जबाबदार धरून बहुजन समाज पक्ष संघटनेच्या वतीने पुढील कार्यवाहीची तयारी जेनुत येईल. तरी आपणाकडून सदर समस्येचे निराकरण करण्यात यावे. या करिता उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी लाखनी यांना निवेदन देण्यात आले असून शशिकांत रामटेके, सोनू बडवाईक, विरू काहालकर, महेश उके, कुणाल बडगे, लालचंद पोहनकर, सुरेश बावनकुळे, जयेश गिरेपुंजे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या