सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098
जामखेड :- महसूल पंधरवडा 2024 तहसील कार्यालय जामखेड. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अ. नगर (दिव्यांग कक्ष) एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा हा कार्यक्रम दिनांक 12/8/2024 रोजी तहसील कार्यालय येथे सकाळी 11.00 वाजता उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. नायब तहसीलदार (निवडणूक) संजय काळे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती मा.विक्रम उंडे (वाचा उपचार तज्ञ समाज कल्याण कार्यालय अ. नगर) व नायब तहसीलदार महसूल अधिकारी विजय इंगळे साहेब. संजय गांधी योजना नायब तहसीलदार विनायक दासरी. गणेश वानखेडे (वाचा उपचार तज्ञ अ.नगर).रेवती भांड (विशेष शिक्षक अ.नगर). विश्वजीत चौगुले (जामखेड तलाठी). माननीय विक्रम उंडे यांनी समाज कल्याण विभाग अंतर्गत शासकीय योजनेबद्दल माहिती देऊन सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले. तसेच नायब तहसीलदार विजय इंगळे साहेब यांनी महसूल पंधरवडा 2024 विविध कार्यक्रमाची माहिती दिली. दिव्यांगांना तहसीलमार्फत मिळणारे लाभ या विषयी माहिती दिली.
जामखेड प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी दिव्यांगांचे समाज कल्याण विभाग व महसूल विभागामध्ये वेगवेगळ्या अडचणी मांडून ते प्रश्न ताबडतोब सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी नाय तहसीलदार यांनी महसूल अन्नधान्य सुरक्षा येथील ऑनलाईन रेशन कार्ड दिव्यांगांना कार्यक्रम चालू असताना वाटप करण्यात आले. समाज कल्याण मार्फत. दिव्यांगांना Udid कार्ड वाटप करण्यात आले. बीज भांडवल आर्थिक साहय कर्जासाठी फार्म वाटप करण्यात आले. अशाप्रकारे समाज कल्याण व महसूल योजनेचे माहिती व फॉर्म देण्यात आले जेणेकरून दिव्यांगांना मदतीचा खऱ्या अर्थाने लाभ मिळाला.
तलाठी विश्वजीत चौगुले साहेब यांनी सर्व दिव्यांगांना व वयोश्री यांना चहा व नाष्टा चे नियोजन केले. तसेच कर्ण बधिर जे दिव्यांग आहे. त्यांना या कार्यक्रमाची माहिती व ट्रान्सलेशन करून.श्री. राहुल भालेराव यांनी व्यवस्थित समजून सांगितले.
तसेच जामखेड प्रहार जनशक्ती पक्षाचे . तालुका अध्यक्ष. नय्युमभाई सुभेदार.. जिल्हा उपाध्यक्ष. जयसिंग उगले. जिल्हा परिषद गट. अध्यक्ष. श्री.राहुल भालेराव. तालुका दिव्यांग सेल अध्यक्ष सचिन उगले. तालुका दिव्यांग उपाध्यक्ष संदीप भुजबळ. दिव्यांग असेल सरचिटणीस. संजय मोरे. सामाजिक कार्यकर्ते नागरगोजे. जिल्हा प्रतिनिधी बंडू उगले. रत्नापूर अध्यक्ष. मच्छिंद्र भोसले. कर्णबधिर सोशल मीडिया सोहेल तांबोळी. संघटक मोसिन शेख. व प्रहार जनशक्ती चे कार्यकर्ते व सर्व दिव्यांग बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या