शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार.
सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
सणसवाडी :-येथील कु.नंदकिशोर बाळासाहेब दरेकर या युवकाने स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून PSI पदाला नुकतीच गवसणी घातली आहे या अतुलनीय यशाबद्दल सणसवाडी नगरीतील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने सणसवाडी नगरीचे माजी उपसरपंच नवनाथ शेठ हरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या .अत्यंत मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करून नंदकुमार दरेकर यांनी हे यश संपादन केले,शिक्षण पूर्ण केल्यानंतर नंदकिशोर यांनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीने हे यश संपादन केले,त्यांच्या या यशामध्ये आई, वडील आणि भाऊ यांचे खुप मोठे योगदान राहिले आहे.PSI पदी नियुक्ती झाल्याबद्दल नंदकिशोर यांचे विविध स्तरांतून कौतुक आणि सत्कार सन्मान होत आहे
*यावेळी सणसवाडी नगरीचे माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे,वंचीत बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा संघटक विश्वनाथ घोडके, सिमाई फौडिशनच्या संस्थापिका सीमाताई पवार,निकिता बानाटे,बाप्पू निकुंभ,विष्णू इंगळे,दत्ता माने,हरिष गुडदे,सुरज करंकाळ,राजू कांबळे,शिवाजी शिंदे सर,तुकाराम मोरे,विक्रम दरेकर,योगेश मगर,सुनील इंगळे,विद्याधर सुरवाडे,आनंदा खिराडे,विपुल घोडके,सुरज मुंडे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते


0 टिप्पण्या