आमदार यशोमती ठाकूर यांना विसर पडला की मुद्दाम फोटो टाकला नाही असा सर्व सामान्यांना प्रश्न पडला आहे.
राजेश येसेकर भद्रावती / चंद्रपूर
चंद्रपूर : स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर आमदार यशोमती ठाकूर यांचे वतीने लावण्यात आलेल्या बॅनर वर "हमने देश बनाया है.." या हेडिंग वर टाकण्यात आलेल्या महापुरुषांच्या फोटो मध्ये विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच नाही.
देश घडवण्या मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाही असे काँग्रेसला सुचवायचे आहे का?
की निवडणूक संपल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे काम नाही असे काँग्रेसला वाटते का?
बॅनर वर महापुरुषांचे फोटो टाकताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने टाकला नसेल तर आमदार यशोमती ठाकूर आंबेडकरी जनतेची माफी मागणार का?
आणि हो... आज दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसलेले बॅनर सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होऊन स्वाभिमानी आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असल्याचे लक्षात आल्यावर नव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ऍड करून बॅनर छापण्यात आले आहे व ते प्रसारित करण्यात येत आहे.. कृपया स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने सावध होऊन जागरूक राहावे.


0 टिप्पण्या