पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त आमच्या बा.म.चौ.कन्या पिंप्री विद्यालयात ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वंदनाजी पाटील मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री. व्ही.जी. पवार सर होते. इयत्ता दहावीत एक ते पाच प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना पिंप्रीतील सेवानिवृत्त आरोग्य सेविका श्रीमती माळी आत्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ बक्षीसे दिली.
तसेच श्री.विश्वनाथ रामदास पाटील यांनीही स्व.रामदास मोतीराम पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथम एक ते तीन येणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षीसे दिली. निधी झेरॉक्सचे संचालक श्री समाधान पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि गोळ्यांचे वाटप करण्यात आले.स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली.
प्रास्ताविकपर मनोगत श्री.एन.आर.बाविस्कर सरांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.पी. बडगुजर सर यांनी केले. क्रीडा शिक्षक श्री.एम.एन.पाटील सरांनी ध्वजारोहणाची धुरा सांभाळली. सदर कार्यक्रमास ग्रामस्थ,विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


0 टिप्पण्या