Ticker

6/recent/ticker-posts

पेसा पदभरतीच्या मागणीसाठी नंदूरबार मध्ये आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा,निदर्शने व जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव


सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन

रुपाली मेश्राम चित्रा न्युज
नंदूरबार - आदिवासी पेसा १७ संवर्गाची १३ जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी आणि तात्काळ पद भरती करा,या मागणीसाठी २३ ऑगस्ट रोजी नंदुरबारमध्ये नवापूर चौफूली ते जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार पर्यंत आदिवासी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला,जोरदार निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालय घेराव घालण्याचा प्रयत्न झाला.पेसा पदभरतीच्या मागणीसाठी  आदिवासी पात्रताधारक उमेदवारांची ०१ ऑगस्ट २०२४ पासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान मध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे.१२ ऑगस्ट रोजी आदिवासी समूहाकडून आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.प्रशासनाकडून २१ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी आदिवासींच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
                              शासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण नंदूरबार जिल्हा बंद चे आवाहन करण्यात आले.तरीही सरकार पेसा भरतीचा विषय गांभीर्याने घेत नसल्यामुळे दिनांक २३ ऑगस्ट रोजी समस्त  आदिवासी संघटना  व आदिवासी विद्यार्थी यांच्याकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,मालती वळवी सहसचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,अजय गावित राष्ट्रीय प्रवक्ता आदिवासी टायगर सेना,अरविंद वळवी सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त,रवींद्र वळवी राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट ,अंकुश नाईक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, प्रकाश गावित आदिवासी क्रांती दल,प्रेमचंद सोनवणे आदिवासी एकता परिषद ,विलास वळवी जय जोहार ग्रूप,दिपक देसाई एकलव्य युवक संग्राम परिषद, शरद सोनी व गणेश सोनवणे एकलव्य आदिवासी युवा संघटना ,तुकाराम पावरा विश्व आदिवासी विद्यार्थी परिषद, अमोल रामराजे ,रामनाथ ठाकरे,कला शिक्षक भरती कृती समिती,राहूल पटले एन एस यू आय नंदुरबार, अक्षय गवळी आदिवासी महासंघ नंदुरबार, अजय वळवी बिरसा आर्मी,सतीश ठाकरे राज्याध्यक्ष संविधान सेना ,गोपाल भंडारी राज्याध्यक्ष बिरसा फायटर्स आदि लाखों कार्यकर्ते उपस्थित होते.
                             पेसा भरती झालीच पाहिजे,अस कसं देत नाय घेतल्याशिवाय राहत नाय,कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय, आदिवासींना न्याय द्या,कला,क्रिडा व संगणक शिक्षकांची भरती करा,आरक्षण आमच्या हक्काचे नाय कुणाच्या बापाचे,शिंदे सरकार होश मे आओ अशा जोरदार घोषणा व निदर्शने करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांना पेसा पदभरती करा व कला ,क्रीडा व संगणक शिक्षकांचीही भरती करा असे दोन निवेदन देण्यात आली व अर्धा तास चर्चा करण्यात आली.सरकारने निवेदनाची दखल न घेतल्यास येणा-या काळात नंदुरबार जिल्ह्य़ातील सर्व सरकारी कार्यालये बंद पाडत चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी शासनास दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या