🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - ६ ऑगस्ट,
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. १५ श्रावण, १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : ग्रीष्म
मास: श्रावण
पक्ष: शुक्ल
तिथी: द्वितीया (२०.००) ~ तृतीया
वार: मंगळवार
नक्षत्र: मघा (१७.४५) ~ पूर्वा
राशी: सिंह
*मंगळागौर पूजन*
*धर्मसम्राट करपात्रस्वामी जयंती*
*महान वैष्णव संत शंकरदेव पुण्यतिथी* असम (तिथीनुसार)
*जागतिक अण्वस्त्र विरोधी दिन*
*अणुशस्त्र जागृती दिन*
*हिरोशिमा दिवस* : हा दिवस दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी महायुद्धाच्या काळात हिरोशिमा वर टाकण्यात आलेल्या अणु बॉम्बच्या वर्धापनदिनाचा प्रतीक आहे. ही भयानक घटना ६ ऑगस्ट १९४५ रोजी घडली. तेव्हा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर “लिटल बॉय” नावाचा अणुबॉम्ब टाकला. दुसरे महायुद्ध १९३९ ते १९४६ पर्यंत चालले होते. अमेरिकेने जगातील पहिला अणु बॉम्ब जपानच्या हिरोशिमा येथे टाकला. जपानच्या एनोला शहरावर टाकण्यात आलेला हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्याने शहराच्या ९०% लोकसंख्येचा नायनाट केला , ७०,००० लोक त्वरित आणि सुमारे १०,००० लोक नंतर किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे मृत्युमुखी पडले.
१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला झाली.
१९४०: सोविएत युनियनने इस्टोनिया बेकायदेशीरपणे बळकावले.
१९४५: जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदाच अणुबाँबचा वापर करण्यात आला. सुमारे ७०,००० लोक ताबडतोब आणि १०,००० नंतर किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे मृत्युमुखी पडले. पुढील अनेक वर्षे तेथील लोकांवर किरणोत्सर्गाचा विपरीत परिणाम झाला.
१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्य यांच्या ३४० धावा.
२०१०: जम्मू आणि काश्मीर मध्ये भयानक पूर आला.
२०११: थायलंडमधील पुईया थाई पार्टीच्या यिंगलुक शिनावात्रा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
२०१२: नासाचे क्यूरिओसिटी रोव्हर मंगळावर पोहोचले.
जन्मदिवस
१८०९: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन
१८८१: पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग.
१९००: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन
१९२५: लेखिका योगिनी जोगळेकर, लेखिका, ४५ कादंबर्या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे.
१९५९: राजेंद्र सिंह, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित “वॉटरमॅन ऑफ इंडिया” म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तसंच ‘तरुण भारत संघ‘ संस्थापक
१९६५: भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज
१९७०: एम. नाईट श्यामलन – पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
मृत्यूदिन
१९२५: सुरेंद्रनाथ बॕनर्जी, काँग्रेसचे एक संस्थापक
१९६५: वसंत पवार, संगीतकार (सांगत्ये ऐका, पठ्ठे बापूराव, बाळा जो जो रे, चिमणी पाखरे, अवघाची संसार, मानिनी, वैजयंता, पसंत आहे मुलगी, धाकटी जाऊ, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड इ. अनेक चित्रपट)
१९९९: कल्पनाथ राय, पूर्व केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते
२००१: आधार कुमार चॅटर्जी, भारतीय नौदल प्रमुख
२०१९: सुषमा स्वराज, २५ व्या वर्षीच हरयाणा सरकारच्या कॅबिनेट मंत्री, १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, २०००-२००३ माहिती आणि प्रसारण मंत्री, २००३-२००४ आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं अशा भाजपच्या झुंजार नेत्या.
*।। दास-वाणी ।।*
सांडून राम आनंदघन ।
ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैंचे समाधान ।
लोलंगतासी ।।
दासबोध: ०३/१०/६२
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सत् चित् आनंदरूप सर्वव्यापी रामाला सोडून जर कोणी शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच विषयांमधेच गुरफटला तर ऐकणे, पाहाणे, गोडधोड खाणे, मुलायम वस्त्रे, सुगंधांचा आस्वाद हेच समृद्ध जीवन असे वाटू लागते.
विषयजनित जे जे सुख ।
ते ते जाणिजे दु:ख ।
पूर्वी गोड अंती शोक ।
नेमस्त आहे ।।
सुरूवातीला गोड वाटते. नंतर चटक लागते. सुखद भावना संपली की दु:खच उरते. हे विषयाधीन माणसाला उमगत नाही. त्यामुळे निर्विषय चिरंतन आनंदघन रामाशिवाय कोणतीही आस तृप्ती देत नाही. मुक्तीही देत नाही. त्यासाठी आधी विरक्ती अंगी बाणायला हवी.
*वैराग्यनिरूपण समास.*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या