Ticker

6/recent/ticker-posts

१४२ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ


• आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी चे आयोजन 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, वात विकार, संधी विकार, नेत्र विकार, रक्तालपता इत्यादी व्याधींवर आयुर्वेदिक चिकित्सा उपक्रम राबविण्यात आले. त्यात १४२ रुग्णांनी आरोग्य तपासणी केली. ज्येष्ठ नागरिकांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती पुस्तकाचे वितरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. 
                     आयुष्यमान आरोग्य मंदिर(आयुष) लाखोरी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोमवार(ता. १२ ऑगस्ट) रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन पंचायत समिती सदस्य सुनील बांते, प्रमुख अतिथी सरपंच सुधीर चेटूले, ग्रामपंचायत सदस्य विलास बांते, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर, सालेभाटा चे वैद्यकिय अधिकारी डॉ. अक्षय कमाने, लाखोरी चे आयुष वैद्यकिय अधिकारी डॉ. पितांबर तलमले, योगा प्रशिक्षक सुनील भाग्यवानी, यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला, धन्वंतरी पूजनाने आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आयुर्वेद व त्याचे फायदे या विषयावर माहिती देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात आयुर्वेदिक वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती पुस्तकांचे वितरण करण्यात आले. आरोग्य तपासणीत व्यादीग्रस्त नागरिकांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, वात विकार, संधी विकार, नेत्र विकार, रक्तालपता इत्यादी व्याधीवर चिकित्सा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात १४२ रुग्णांनी आरोग्य तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नवीन डेकाटे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर यांचे मार्गदर्शनात आयुष अधिकारी डॉ. पितांबर तलमले, राजेगाव चे आयुष अधिकारी डॉ. अर्चना सोनटक्के, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कुमारी नेहा सूर्यवंशी, डॉ. कुमारी श्रीफळ रामटेके, डॉ. कुमारी सुचिता शेंडे, आरोग्य सेविका माधुरी लिमजे, कांचन चेटूले, कुमारी लता किंदरले, आरोग्य सेवक गुलाब कावळे, नेत्र तपासणी ओपथालमिक अधिकारी नादिरा मेश्राम, सर्व आशा स्वयंसेविका, लाखोरी उपकेंद्रातील परिचर गीताबाई व अनिताबाई यांनी आरोग्य शिबिर पार पाडण्यास सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या