• भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांचे प्रतिपादन
• लाखनी येथे भाजपा चा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खोट्या बातम्या(फेक नरेटिव्ह) पसरवून खोटी आश्वासने दिली. भाजपा सत्तेत आल्यास संविधान बदलावणार, ओबीसींना न्याय मिळत नाही, अल्प संख्यांक असुरक्षित आहेत. तर दर महिन्याला महील्यांच्या खात्यात ८ हजार ५०० रुपये जमा होणार अशी खोटी आश्वासने देऊन संभ्रम निर्माण केल्याने भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. पण भाजपा कार्यकर्त्यांनी खचून न जाता येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते संताजी मंगल कार्यालय लाखनी येथे तालुका भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यात पोहरा येथील कुमारी अश्विनी अण्णा फटे तर सोसायटीचे संचालक योगराज अंबादे यांचा समावेश आहे.
संताजी मंगल कार्यालय लाखोरी रोड लाखनी येथे मंगळवारी(ता.१३ ऑगस्ट) रोजी भारतीय जनता पार्टीचा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, प्रमुख उपस्थितांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे संघटन मंत्री बाळा अंजनकर, माजी आमदार राजेश(बाळा) काशीवार, माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, डॉ. श्याम झिंगरे, प्रांत सदस्य रेखाताई भाजीपाले, ज्येष्ठ नेते तू. रा. भुसारी, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत देशमुख, पद्माकर बावनकर, डॉ. सुदाम शहारे, खरेदी-विक्री अध्यक्ष घनश्याम खेडीकर, मा.वा. बोळने, भाजपा तालुकाध्यक्ष श्रावण कापगते, नगरसेवक सत्यवान वंजारी, सिनेट सदस्य मनीष वंजारी, घनश्याम मते, शरद निर्वाण, सुधीर राघोर्ते, विक्रम रोडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी सांगितले की लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो तरी केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा विधानसभा जोमाने लढायची आहे. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले पण पराभव झाला. याचे कारण विरोधक आहे. त्यांनी खोट्या बातम्या पेरल्या तसेच खोटी आश्वासने देऊन संभ्रम निर्माण केला. पण भाजपा कार्यकर्त्यांनी खचून न जाता जशास तसे उत्तर द्यावे. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना", "वनश्री योजना" या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी देऊन महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज थकबाकी माफ केली. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना विजेचे बील लागणार नाही. तर सौरऊर्जेचा वापरही शेतकऱ्यांना करता येणार असल्याचे सांगितले. या कार्यकर्ता मेळाव्यात इतर पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यात पोहरा येथील उच्च शिक्षित कुमारी अश्विनी अण्णा फटे व सोसायटीचे संचालक योगराज अंबादे यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे व इतर मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या मेळाव्यास बूथस्तरीय तथा तालुकास्तरीय पुरुष व महिला कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या