कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
भंडारा:- लाखनी येथील पंचायत समिती, महिला व बालकल्याण तथा तहसील कार्यालयाच्या वतीने संयुक्त विद्यमाने "हर घर तिरंगा, घर घर तिरंगा" जनजागृती मोहीम राबविण्यात आली लोकांना दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले. येत्या स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील प्रत्येक घरांवर तिरंगा फडकणार आहे. यासाठी जनजागृती "हर घर तिरंगा" मोहिमेसाठी पंचायत समिती कार्यालयापासून शहरात रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रणाली विजय सार्वे, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, गटविकास अधिकारी नेताजी धारगावे, बालविकास प्रकल्प अधिकारी मेंढे, गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, कक्ष अधिकारी मुलचंद केवट, अधीक्षक देव्हारे, विस्तार अधिकारी मेश्राम, चव्हाण, जोडे, रोडगे, हटकर यांचेसह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या जनजागृती अभियानात अंदाजे ३०० नागरिक सहभागी झाले होते. तसेच जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या बँड पथकाने विशेष सहकार्य केले.


0 टिप्पण्या